जुनी सांगवीत पादचाऱ्यावर गोळीबार 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 03:13 AM2021-01-10T03:13:03+5:302021-01-10T03:13:32+5:30

अज्ञात इसमाने केलेल्या गोळीबारामुळे पादचारी जखमी झाला. आनंद नगर, जुनी सांगवी येथे शनिवारी (दि. ९) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. 

Shooting at an old-fashioned pedestrian | जुनी सांगवीत पादचाऱ्यावर गोळीबार 

जुनी सांगवीत पादचाऱ्यावर गोळीबार 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
पिंपरी : अज्ञात इसमाने केलेल्या गोळीबारामुळे पादचारी जखमी झाला. आनंद नगर, जुनी सांगवी येथे शनिवारी (दि. ९) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. आनंद ललित कुमार सोलंकी (वय ३०, रा. जुनी सांगवी) असे जखमी पादचाऱ्याचे नाव आहे. आनंद हे मोबाईलवर बोलत रस्त्याने पायी जात असताना अज्ञात इसमाने पाठीमागून त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी कानाला लागून ते जखमी झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

Web Title: Shooting at an old-fashioned pedestrian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.