शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
2
काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा
3
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू
4
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
5
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
6
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
7
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?
8
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
9
पावसाचं आगमन अन् भारतीय कर्णधाराची तारांबळ; रोहित-द्रविडचा मजेशीर VIDEO
10
Lok Sabha Election 2024 : लोकसभेला सट्टाबाजाराचा कल; फलोदी सट्टा बाजार एनडीएच्या बाजूने की इंडिया आघाडीला पसंती
11
इंग्लंडमध्ये तरूणीने पाकिस्तानच्या शादाबची लाज काढली; एका वाक्यातच बोलती बंद
12
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
13
4 जूनला निवडणूक निकालानंतर हे 50 शेअर रॉकेट बनणार; एक्सपर्ट म्हणतायत, मालामाल करणार!
14
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
15
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
16
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
17
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
18
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
19
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
20
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 

धक्कादायक! अत्यावश्यक सेवेच्या पाससाठी पोलीस ठाण्यात चकरा मारणारा व्यावसायिक निघाला कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 8:38 PM

एक व्यावसायिक त्याचे दुकान सुरू करण्यासाठी पास मिळावा म्हणून पोलीस ठाण्यात गेला होता.

ठळक मुद्देखबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात येणार आवश्यकता असल्यास पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात येणार

पिंपरी : अत्यावश्यक सेवेचा पास मिळावा म्हणून पोलीस ठाण्यात चकरा मारणारा व्यावसायिक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात हा प्रकार घडला. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. कोेरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. वाहनबंदी व जमावबंदी असल्याने पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मात्र जीवनावश्यक वस्तू तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहने व नागरिकांना यातून वगळण्यात आले आहे. या सेवेतील नागरिकांना पोलिसांकडून पास उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पोलीस ठाणे स्तरावर या पासचे वितरण होत आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित नागरिकांना अर्ज करावा लागतो. त्यानुसार एक व्यावसायिक त्याचे दुकान सुरू करण्यासाठी पास मिळावा म्हणून पोलीस ठाण्यात गेला होता. तेथे अर्ज करून पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांशी त्याने चर्चा केली. त्यानंतर संबंधित व्यावसायिकाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात येणार आहे. तसेच अति अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांना पोलीस ठाण्यात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यकता असल्यास पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस