शिवसेनेला पायघड्या

By Admin | Updated: July 9, 2016 03:54 IST2016-07-09T03:54:22+5:302016-07-09T03:54:22+5:30

महापालिकेच्या सत्तेतून राष्ट्रवादीला मुक्त करण्यासाठी भाजप, शिवसेना व रिपब्लिकन अशी महायुती आवश्यक आहे. त्यावर भाजपच्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे

Shivsena's legs | शिवसेनेला पायघड्या

शिवसेनेला पायघड्या

पिंपरी : महापालिकेच्या सत्तेतून राष्ट्रवादीला मुक्त करण्यासाठी भाजप, शिवसेना व रिपब्लिकन अशी महायुती आवश्यक आहे. त्यावर भाजपच्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे एकमत झाले. त्यानुसार स्थानिक भाजपतर्फे प्रदेश कार्यालयाकडे महायुतीचा प्रस्ताव पाठविणार आहे.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी महापालिका निवडणुकीत युती करावी की करू नये, याविषयी सत्तेसाठी महायुती आवश्यक आहे, यावर कार्यकर्त्यांत एकमत झाले आहे, अशी भूमिका अमर साबळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मांडली.
ते म्हणाले, ‘‘भाजपाने महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी बूथ, प्रभाग, मंडल भक्कम करण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार एक बूथमागे दहा युवक आणि ३० मतदारांमागे दहा कार्यकर्ते नियुक्त करण्यात येणार आहे. त्यात बहुतांश पदाधिकाऱ्यांनी निवडणूक शिवसेनेसोबत लढविल्यास १००हून अधिक नगरसेवक निवडून येऊ शकतात. मतदारांनाही युती व्हावे, असे मत व्यक्त केले. युती करण्यासंदर्भात शिवसेनेच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांना प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घडलेले परिवर्तन महापालिका निवडणुकीतही घडेल. राष्ट्रवादीच्या गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे आमच्याकडे आहेत.’’
शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप म्हणाले, ‘‘दोन्ही पक्षांची युती झाल्यास महापालिकेत सत्ता
येण्यास मदत होणार आहे.’’
या वेळी एकनाथ पवार, उमा खापरे, सदाशिव खाडे, सारंग कामतेकर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Shivsena's legs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.