शिवसेना पदाधिकाऱ्याला तलवारीने केक कापणे भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 03:00 IST2019-01-30T02:59:55+5:302019-01-30T03:00:08+5:30
बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल

शिवसेना पदाधिकाऱ्याला तलवारीने केक कापणे भोवले
पिंपरी : हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुळशी तालुक्यातील सूस येथे तलवारीने केक कापुन वाढदिवस साजरा करणे शिवसेनेच्या एका पदाधिकाºयाला भोवले आहे. वाढदिवस साजरा होत असताना, बेकायदा शस्त्र बाळगल्याचा तसेच महाराष्टÑ पोलीस अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. बाळासाहेब चांदेरे असे त्यांचे नाव असून शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून ते या परिसरात कार्यरत आहेत.
पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने १५ जानेवारी २०१९ ला शस्त्र, तलवारी, भाले बाळगण्यास मनाई असल्याचा आदेश जारी केला आहे. असे असताना,२६ जानेवारीला चांदेरे यांनी मित्र परिवाराला बरोबर घेऊन चक्क तलवारीने केक कापला. तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे त्यांना भोवले. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार आर.एम.भालचिम यांनी या प्रकरणी चांदेरे यांच्याविरूद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी आर्म अॅक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच आयुक्तांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा नोंदवला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गवारी अधिक तपास करीत आहेत.