शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

महापालिकेत शिवसेना नगरसेविकेचा विषय समिती सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 8:26 PM

महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीत नवीन सदस्यांची सोमवारी निवड झाली.

ठळक मुद्देशिवसेनेत खासदार श्रीरंग बारणे आणि महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे असे दोन गट

पिंपरी : महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्यांची सोमवारी सर्वसाधारण सभेत निवड झाली. यात रेखा दर्शले यांनी त्यांची नियुक्ती जाहीर होताच तडकाफडकी  सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीत नवीन सदस्यांची सोमवारी निवड झाली.पक्षीय संख्याबळानुसार प्रत्येक समितीत एक नगरसेवकाची यानुसार शिवसेनेच्या चार सदस्यांची निवड करण्यात आली. शिवसेनेत खासदार श्रीरंग बारणे आणि महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे असे दोन गट आहे. त्यामुळे शिवसेनेत धुसफूस सुरू असते. विषय समिती सदस्यांच्या निवडीत बारणे गटाचे प्रमोद कुटे, नीलेश बारणे, अश्विनी चिंचवडे यांची आणि राहुल कलाटे यांच्या प्रभागातील नगरसेविका रेखा दर्शले यांची वर्णी लागली. 

कोणत्याही प्रकारच्या गटबाजीतून नव्हे तर वैयक्तिक कारणास्तव आपण विषय समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या सदस्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. त्यामुळे नागरिकांची कामे मार्गी लागण्यास त्याचा उपयोग होत नाही.- रेखा दर्शले, नगरसेविका, शिवसेना

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडShiv Senaशिवसेना