चिठ्ठी उचलून झाली उपसरपंचाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 02:30 IST2018-09-26T02:30:22+5:302018-09-26T02:30:38+5:30
टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नुकतीच भाजपा टाकवे वडेश्वर गटाचे अध्यक्ष रोहिदास असवले यांची निवड केली.

चिठ्ठी उचलून झाली उपसरपंचाची निवड
कामशेत : टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नुकतीच भाजपा टाकवे वडेश्वर गटाचे अध्यक्ष रोहिदास असवले यांची निवड केली.
टाकवे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सुप्रिया मालपोटे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदासाठी दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. यामध्ये दोन्ही
उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने अखेर चिठ्ठीवरती निर्णय करण्याचे ठरले़ त्यानुसार चिठ्ठी उचलून रोहिदास असवले यांची निवड
जाहीर करण्यात आली.
ग्रामविकास अधिकारी एस. बी. बांगर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम केले. या वेळी माजी सरपंच तुकाराम असवले, पोलीस पाटील अतुल असवले, संचालक अंकुश आंबेकर, किसन ननावरे, बबन जाधव, किसन मालपोटे, पोलीस पाटील दत्ता ढाकोळ, सोमनाथ म्हाळुंगे, नवनाथ आंबेकर, उमाकांत मदगे, मधुकर कोकाटे, गुलाब जाभुळकर, संजय जगताप, चंद्रकांत असवले, संजय क्षीरसागर, शंकर असवले, विश्वनाथ असवले, नितीन कदम, पांडुरंग जाधव, काळुराम घोजगे, विकास असवले, विनायक सावंत, बजरंग इंगळे, प्रशांत ढाकोळ, साईनाथ असवले, किरण साबळे आदी उपस्थित होते.