गुप्त मतदान पद्धतीलाच फासला जातोय हरताळ

By Admin | Updated: February 6, 2016 01:31 IST2016-02-06T01:31:02+5:302016-02-06T01:31:02+5:30

बोगस मतदानाला आळा घालण्याच्या नावाखाली लोकशाहीतील गुप्त मतदान पद्धतीलाच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत हरताळ फासण्याचे घाटत आहे

The secret polling system is being eliminated | गुप्त मतदान पद्धतीलाच फासला जातोय हरताळ

गुप्त मतदान पद्धतीलाच फासला जातोय हरताळ

पुणे : बोगस मतदानाला आळा घालण्याच्या नावाखाली लोकशाहीतील गुप्त मतदान पद्धतीलाच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत हरताळ फासण्याचे घाटत आहे. तुम्हाला मतदार म्हणून मतदानाचा हक्क बजवायचा असेल तर मतपत्रिकेबरोबरच तुम्हाला स्वत:चे ओळखपत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी हा अजब फतवा काढला आहे.
गुप्त मतदान हा कोणत्या संस्थेच्या पारदर्शक कारभारासाठी आवश्यक घटक आहे. अगदी सोसायटीपासून ते लोकसभेपर्यंत हे तत्त्व पाळले जाते. मात्र, साहित्य विश्वातील मातृसंस्था मानल्या जाणाऱ्या साहित्य परिषदेने या नियमाचा भंग केल्याने उमेदवारांसह मतदारांमध्येही टीकेचा सूर उमटत आहे.
मतपत्रिका पोस्टात टाकताना मतदारांना ओळखपत्र म्हणून छायाचित्राचा समावेश असलेल्या पॅनकार्ड, आधार कार्ड किंवा वाहन परवाना यासारख्या गोष्टी पुरावा म्हणून सादर कराव्या लागणार आहेत. जे कुणी मतपत्रिकेबरोबर हे पुरावे सादर करणार नाहीत, त्यांची मतपत्रिका बाद केली जाणार आहे. नियम धाब्यावर बसवून निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा अधिकार साहित्य परिषदेला कुणी दिला असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: The secret polling system is being eliminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.