दु:खाचा शोध घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2016 00:51 IST2016-01-25T00:51:44+5:302016-01-25T00:51:44+5:30

मानव मोहपाशात (मलांमध्ये) अडकल्यानेच माणूस दु:खी बनला आहे. एका दु:खावर उपाय करावा, तोच दुसरे दु:ख समोर उभे राहते.

Search for sorrow | दु:खाचा शोध घ्या

दु:खाचा शोध घ्या

पिंपरी : मानव मोहपाशात (मलांमध्ये) अडकल्यानेच माणूस दु:खी बनला आहे. एका दु:खावर उपाय करावा, तोच दुसरे दु:ख समोर उभे राहते. अशी अनुभूती त्यांच्या वाट्याला येते म्हणूनच समस्त दु:खांचे निवारण करायचे असेल, तर ही दु:ख येतात कुठून याचा शोध घेण्याची व पाशातून बाहेर पडण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जगद्गुरूडॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी येथे केले.
शाहूनगरच्या अभिषेक विद्यालयाच्या पटांगणात पिंपरी-चिंचवड व पुणे लिंगायत समाजबांधवांच्या महांतेश चरंतीमठ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी गौरीशंकर शिवाचार्य स्वामीजी, शिवाचार्य स्वामीजी (अंबाजोगाई), महांतेश चरंतीमठ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गुरुराज चरंतीमठ, स्वागताध्यक्ष आण्णाराय बिरादार, अध्यक्ष बसवराज कुल्लोळी, नगरसेवक नारायणराव बहिरवाडे, ट्रस्टचे आधारस्तंभ राचैय्या चरंतीमठ, उद्योजक मल्लय्या स्वामी, विश्वनाथ हिरेमठ, वीरशैव सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष रघुनाथ नष्टे उपस्थित होते.
शिवाचार्य महास्वामी म्हणाले, ‘‘पाशांमुळे जीवात्मा बंधनात अडकतो. जन्मापासून दु:ख त्याचा पाठलाग करते. या समस्त दु:खाच्या निवारणासाठी त्या दु:खाच्या मुळाशी जायला हवे. दु:ख हा धूर आहे, तर मल (पाश) ही आग आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Search for sorrow