कर्जदाराच्या मिळकतीला रुपी बँकेने ठोकले सील

By Admin | Updated: July 21, 2015 03:11 IST2015-07-21T03:11:53+5:302015-07-21T03:11:53+5:30

बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करणाऱ्या कर्जदारांची मालमत्ता जप्त करण्यास रुपी को. आॅप. बँकेने सुरुवात केली आहे. सोमवारी

Seal sealed by the Rupee Bank by the banker's income | कर्जदाराच्या मिळकतीला रुपी बँकेने ठोकले सील

कर्जदाराच्या मिळकतीला रुपी बँकेने ठोकले सील

पिंपरी : बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करणाऱ्या कर्जदारांची मालमत्ता जप्त करण्यास रुपी को. आॅप. बँकेने सुरुवात केली आहे. सोमवारी भोसरीतील एका कर्जदाराची मिळकत सील करण्यात आली.
अभिसान एजन्सीजच्या शिला सिंग यांनी रुपी बँकेच्या भोसरी शाखेकडून कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम भरण्याबाबत वेळोवेळी कळवूनही त्यांनी रक्कम जमा केली नाही.
त्यामुळे त्यांच्या भोसरीतील मिळकतीचा ताबा मिळण्यासाठी बँकेने जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. त्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मिळकतीचा ताबा घेण्याचे आदेश अप्पर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड यांना दिले होते. त्यानुसार सोमवारी कारवाई करण्यात आली.
नायब तहसीलदार यांनी पंच व पोलीस यांच्या उपस्थितीत मिळकतीचा ताबा घेऊन रुपी बँकेच्या भोसरी शाखेकडे दिला.
(प्रतिनिधी)

Web Title: Seal sealed by the Rupee Bank by the banker's income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.