शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा धक्का बसून इंदोरी येथे शाळकरी मुलीचा करुण अंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 19:21 IST

आमराईच्या कुंपणाजवळील आंबे वेचण्यासाठी पिंकी व तिची दोन भावंडे इंदोरी येथील पिंजण मळा येथे गेले होते.तेथील संरक्षण तारेमध्ये विजेचा प्रवाह होता..

ठळक मुद्दे दोषी व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार

तळेगाव दाभाडे : इंदोरी जवळील पिंजणमळा येथील अमराईच्या संरक्षण तारेमध्ये सोडलेल्या विजेच्या प्रवाहाचा धक्का बसून एका शाळकरी मुलीचा करुण अंत झाला.पिंकी बापू केदारी (वय ११ रा.इंदोरी ,ठाकरवस्ती)असे मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे.शनिवारी (दि. ८) सकाळी ९ च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. आदिवासी ठाकर समाजातील मुलीचा असा करुण अंत झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री इंदोरी परिसरात वादळी पाऊस पडला. अमराईच्या कुंपणाजवळील आंबे वेचण्यासाठी पिंकी केदारी व तिची दोन  भावंडे इंदोरी येथील पिंजण मळा येथे गेले होते.तेथील संरक्षण तारेमध्ये विजेचा प्रवाह होता. याची पुसटशी  कल्पनाही पिंकीला नव्हती. विजेचा तीव्र  धक्का बसून तिचा जागीच मृत्यू  झाला.पिंकी केदारी ही इंदोरी येथील जिल्हा परिषद् प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता  चौथीमध्ये शिक्षण घेत होती.ती हुशार व गुणी मुलगी होती. आंबे संरक्षित करण्याच्या उद्देशाने सोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे एका बलिकेचा बळी गेला आहे.............सविस्तर चौकशी करून या प्रकरणातील दोषी व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांनी दिली............* इंदोरी येथील पिंजणमळा येथे सरंक्षण तारेमध्ये विजेचा प्रवाह सोडण्यात आला होता. त्यासाठी वापरलेली सामग्री जप्त करण्यात आली आहे. सदर प्रवाह सरंक्षण तारेमध्ये कोणी सोडला होता हा तपास चालू आहे.दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल  करण्यात येईल.

साधना पाटील  (सहाय्याक पोलीस निरीक्षक , तळेगाव एम्आईडीसी) ................* संरक्षण कुंपण जाळी मध्ये विद्युत् विजेचा प्रवाह सोडणे हे अनधिकृत आहे.अशा कोणत्याही कामासाठी  महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी  कोणतीही  कसलीही परवानगी देत नाही .सदर घटने मध्ये रेक्टिफायर च्या मदतीने वीज प्रवाह सोडण्यात आला होता. राजेंद्र गोरे, उपकार्यकारी अभियंता, विज वितरण कंपनी, उपविभाग तळेगाव दाभाडे

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसDeathमृत्यूmahavitaranमहावितरण