स्कूलबसला कंटेनरची धडक; ६ विद्यार्थी जखमी

By Admin | Updated: January 23, 2017 02:38 IST2017-01-23T02:38:44+5:302017-01-23T02:38:44+5:30

स्कूलबसला मालवाहू कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा शाळकरी विद्यार्थी जखमी झाले. ही घटना

School buses container; 6 students injured | स्कूलबसला कंटेनरची धडक; ६ विद्यार्थी जखमी

स्कूलबसला कंटेनरची धडक; ६ विद्यार्थी जखमी

आळेफाटा : स्कूलबसला मालवाहू कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा शाळकरी विद्यार्थी जखमी झाले. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा चौकापासून जवळच घडली.
संगमनेर तालुक्यातील अकलापूर व परिसरातून विद्यार्थ्यांना आळेफाट्याच्या जिल्हा परिषद व शिवछत्रपती विद्यालयात ही बस येत होती. आळेफाटा चौकापासून अवघ्या काही अंतरावर पाठीमागून येणाऱ्या मालवाहू कंटेनरने धडक दिली.
संचिता विकास गायकर (वय १०), रोशन चंद्रकांत साबळे (वय १३), गौरवी राजू चौधरी (वय ११), प्रियंका प्रवीण करंजेकर (वय १३), कार्तिक खंडू हुलवळे (वय १५), सिद्धीका विकास लामखडे (वय १३, सर्व रा. अकलापूर) विद्यार्थी जखमी
झाले. गटविकास अधिकारी सतीश गाढवे, गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनीरूगणालयात जावून जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. (वार्ताहर)

Web Title: School buses container; 6 students injured