शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये बनावट पोलिस पडताळणी प्रमाणपत्रांचा गोरखधंदा  

By नारायण बडगुजर | Updated: December 11, 2024 18:06 IST

टोळीवर कारवाई : दहशतवाद विरोधी शाखेकडून पर्दाफाश

पिंपरी : बनावट पोलिस पडताळणी प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेने पर्दाफाश केला आहे. दोन एजंट आणि त्याच्या साथीदारांवर याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही टोळी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांकडून मिळतील तेवढे पैसे घेऊन त्यांना बनावट पोलिस पडताळणी प्रमाणपत्र पाठवत असे. मोबाईल फोनवरून हा गोरखधंदा सुरू होता.पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेचे (एटीबी) पोलिस शहरातील लष्करी, सरकारी तसेच महत्त्वाच्या खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या खासगी व्यक्तींची माहिती जमा करीत आहेत. दिघी येथील टीसीएल कंपनीमध्ये काम करणाऱ्या वाहन चालक, हाऊस किपींग स्टाफ, सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची पोलिस पडताळणी प्रमाणपत्रांची तपासणी करीत होते. त्यावेळी त्यातील काही कामगारांकडे बनावट पीसीसी (पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट) असल्याचे आढळून आले.एटीबीने त्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी दोन एजंटना १२०० ते १६०० रुपये देऊन हे प्रमाणपत्र घेतल्याचे आढळले. यात ४१ पोलिस पडताळणी प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले. हे प्रमाणपत्र बनावट असल्याची कल्पना संबंधित कामगारांना नव्हती. सहकारी मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपन्यांमधील कामगार संशयितांच्या मोबाईलवर संपर्क करत. त्यांना आवश्यक कागदपत्रे मोबाईलवर पाठवली जात. त्यानंतर १५ दिवसात संबंधित कामगाराच्या मोबाईलवर पोलिस पडताळणी प्रमाणपत्र येत असे. तसेच काही व्यक्तींना येरवडा व चतु:श्रृंगी पोलिस ठाणे येथून साधर्म्य असलेल्या पत्यांवरून बनावट प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले. याबाबत एजंट संदीप बनसोडे (रा. येरवडा, पुणे), सुनील रोकडे (रा. पिंपळे गुरव) आणि त्यांना मदत करणाऱ्या इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. संशयितांनी २०२१ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत हा गोरखधंदा केला.पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास राऊत, उपनिरीक्षक  शामवीर गायकवाड, पोलिस अंमलदार पुंडलिक पाटील, अरुण कुटे, सुरज मोरगावकर, तुषार कदम यांच्या पथकाने ही कामगिरी केली.  

आपल्या आस्थापनेत काम करणाऱ्या कामगारांचे पोलिस पडताळणी प्रमाणपत्र खरे आहे का, याची खातरजमा करावी. संबंधित आस्थापना चालकांनी नजिकच्या पोलिस ठाणे, पोलिस आयुक्त कार्यालय अथवा दशतवाद विरोधी शाखेतून खातरजमा करून घ्यावी.- डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी