प्रोजेक्टर खरेदीतही घोटाळा
By Admin | Updated: July 9, 2016 03:54 IST2016-07-09T03:54:43+5:302016-07-09T03:54:43+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या दहा प्रोजेक्टर खरेदीत घोटाळा झाला आहे. बाजारात एक नग प्रोजेक्टर सुमारे ५५ हजार रुपयांना मिळत असताना

प्रोजेक्टर खरेदीतही घोटाळा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या दहा प्रोजेक्टर खरेदीत घोटाळा झाला आहे. बाजारात एक नग प्रोजेक्टर सुमारे ५५ हजार रुपयांना मिळत असताना तीच वस्तू ७८ हजाराला खरेदी करण्याचा डाव असून, प्रोजेक्टरच्या खरेदीत २ लाख ३० हजारांची लूट केली जाणार आहे, असा आरोप नगरसेविका सीमा सावळे व आशा शेंडगे यांनी केला आहे. खरेदी रोखून करदात्यांचे पैसे वाचवावेत, अशी मागणी आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, महापालिका प्रशासन आणि ठेकेदार संगनमताने शिलाई मशिन, प्रयोगशाळेची उपकरणे, सन्मानचिन्ह, व्यायामशाळेचे साहित्य, सायकल, सोनोग्राफी मशिन आणि रोपांची खरेदी जादा दराने होत असल्याचे उघड केल्यानंतर साहित्याची खरेदी तातडीने थांबविली होती.
त्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांसाठी १० नग प्रोजेक्टर खरेदी करण्याचा विषय स्थायीने मंजूर केला आहे. या खरेदीसाठी तीन पुरवठादारांनी निविदा सादर केल्या. त्यातील एका पुरवठादाराकडून दहा नग प्रोजेक्टर खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे. (प्रतिनिधी)