शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकमध्ये ‘मला राग येतोय...’ म्हणणं पडतंय महागात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 20:12 IST

क्षुल्लक कारणांवरून अनेकांचा संयम सुटत असून होताहेत हल्ले

ठळक मुद्देक्षुल्लक कारणांवरून केली जातेय दुखापतसप्टेंबरमध्ये ३७, तर ऑक्टोबरमध्ये ७३ गुन्हे दाखल

नारायण बडगुजर-पिंपरी : जुन्या भांडणाचा राग, भांडणातील मध्यस्थी, लहान मुलांमध्ये खेळताना झालेला वाद, यासारख्या क्षुल्लक कारणांवरून अनेकांचा संयम सुटत आहे. यातून मारहाण करून दुखापत केली जात आहे. दुखापत केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध पोलीस ठाण्यांत सप्टेंबरमध्ये ३७ तर ऑक्टोबरमध्ये ७३ गुन्हे दाखल झाले आहेत. लाॅकडाऊन शिथिल होत असताना हे गुन्हे दुपटीने वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.

कोरोना महामारीमुळे लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर एप्रिलमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले होते. नागरिक घरातच असल्याने थेट संपर्क कमी झाला होता. मात्र लाॅकडाऊन शिथिल होत असतानाच नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले. तसेच लहान मुलेही घराबाहेर येऊ लागले आहेत. खेळताना त्यांच्यात वाद होतात. त्यातून बहुतांशवेळा पालकांमध्ये ‘जुंपून’ हातापायी होत असल्याचे दिसून येते. तसेच भररस्त्यात वाहन पार्क करणे, ओव्हरटेक करणे, गाडी बाजूला घेण्यास सांगणे, गाडी रस्त्यात वाहनासमोर आडवी लावणे, अशा कारणांवरून राग अनावर होऊन गंभीर दुखापत केली जात आहे.

कोरोना काळात अनेक नाती दुरावली, तर अनेक दुरावलेली नाती जवळ आली. मात्र, काही ठिकाणी किरकोळ कारणांवरून वादाचे प्रकारही घडले आहेत. मात्र, प्रत्येकानेच रागावर नियंत्रण ठेवायला हवे, असे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले. 

जडणघडणीवर परिणामप्रत्येकाच्या वर्तवणुकीला पार्श्वभूमी असते. जन्मजात अर्थात अनुवांशिक गुणधर्म, मानसिक वाढ आणि सामाजिक परिस्थिती याचा परिणाम प्रत्येकाच्या जडणघडणीवर होतो. त्यातून प्रत्येकाचे व्यक्तीमत्व घडते. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी. त्यामुळे चुकीच्या किंवा गुन्हेगारी कृत्यांना आळा बसण्यास मदत होईल. व्यसने टाळल्यास चिडचिड होणार नाही. राग नियंत्रित राहील.  - डॉ. मनजित संत्रे,  मानसोपचारतज्ज्ञ, वायीसीएम रुग्णालय, पिंपरी 

...तर प्रतिबंधात्मक कारवाईतत्कालीन परिस्थिती आणि कारणांमुळे वाद होतात. वादावर नियंत्रण मिळविणे शक्य असते. थोडा वेळ संयम ठेवल्यास पुढील अनर्थ टळतो. त्यासाठी सर्वांनीच संयम ठेवावा. किरकोळ कारणावरून असे गुन्हे घडले आहेत. सर्व गुन्हे उघडकीस आले आहेत. शरीरास दुखापत केल्याप्रकरणात कडक कारवाई तसेच दोन किंवा जास्त गुन्हे करणाऱ्या आरोपींवर प्रतिबंधक कारवाई सुरू आहे.- आर. आर. पाटील,  सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), पिंपरी-चिंचवड

सूडभावना बळावतेय...अनेक जण जुन्या भांडणाचा राग मनात धरून असतात. सूडभावनेतून काेणत्याही क्षुल्लक कारणावरून त्यांच्याकडून वाद उकरून काढला जातो. यातून मारहाण करून दुखापत केली जाते. पोलिसांकडे तक्रार का केली, तक्रार मागे घे, तुला बघून घेतो, असे म्हणून हत्याराचा वापर करून जखमी केले जाते.

रागावर नियंत्रणासाठी...दीर्घ श्वास घ्यावा प्रतिक्रिया न देता शांत रहामनात १०० पर्यंत क्रमांक मोजावेतवाद होत असलेल्या जागी थांबू नकापाणी प्यावे, थोडे चालावे 

दुखापतीचे दाखल गुन्हेजानेवारी ते ऑक्टोबर - ५१५ ऑगस्ट   सप्टेंबर   ऑक्टोबर  ३४         ३७           ७३

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस