शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
2
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
3
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
4
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
6
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
7
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
8
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
9
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
10
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
12
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
13
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
14
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
15
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
16
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
17
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
18
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
19
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
20
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार

माऊलींची पालखी पुण्याकडे निघाली अन् इंद्रायणी पुन्हा फेसाळली! मुख्यमंत्र्यांनी दिले होते आदेश

By विश्वास मोरे | Updated: June 30, 2024 12:42 IST

आळंदी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले असता त्यांनी प्रशासनाला नदी प्रदूषण रोखण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, ते जाऊन १२ तास झाले नाही तर इंद्रायणी पुन्हा फेसाळली

पिंपरी: आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरीसाठी रविवारी सकाळी पुण्याकडे निघाली. आणि नेहमीप्रमाणे इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे.

आषाढी वारी सुरू झालेली आहे. इंद्रायणी तीरावरील देहू आणि आळंदीतून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज,  ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्याकडे मार्गस्थ झालेले आहेत. गेल्या वर्षभरापासून इंद्रायणी नदी फेसाळत आहे. मात्र, त्याचे कारण प्रदूषण नियंत्रण मंडळ, पीएमआरडीए, आळंदी नगरपालिका, चाकण एमआयडीसी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना सापडलेले नाही.

वारीच्या निमित्ताने इंद्रायणी नदीमध्ये पाणी सोडण्यात आले होते.  ते पाणी आता कमी झाले आहे. सकाळी माऊलींची पालखी पुणे मुक्कामाकडे मार्गस्थ झाली. आळंदीतील बंधाऱ्यापासून पुन्हा इंद्रायणी नदी फेसाळले आहे. याबाबतचे वृत्त सोशल मीडियावर पसरल्यानंतर प्रशासनाने नदीतील फेस कमी व्हावा यासाठी यंत्रणा सुरू केलेली आहे. 

मुख्यमंत्री जाऊन बारा तास झाले नाही, तर इंद्रायणी फेसाळली

आळंदी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले असता त्यांनी नदी प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली होती.  व प्रशासनाला नदी प्रदूषण रोखण्याबाबत आदेश दिले होते. मात्र,  ते जाऊन बारा तास होत नाही. तोच इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे प्रशासनाला कोणतेही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीEknath Shindeएकनाथ शिंदेpollutionप्रदूषणindrayaniइंद्रायणीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा