शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

संजोग वाघेरे यांनी अजितदादांची साथ सोडली अन् शिवसेनेची उमेदवारी मिळवली

By विश्वास मोरे | Updated: March 27, 2024 18:07 IST

संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना महापौर, पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली, ते शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ होते.

पिंपरी : माजी महापौर संजोग वाघेरे यांचे कुटुंब शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ. मात्र, मावळमधून राष्ट्रवादीला उमेदवारी मिळणार नाही, याची जाणीव झाल्याने तीन महिन्यापूर्वी दादा आणि साहेबांची साथ सोडून वाघेरे यांनी घड्याळाची साथ सोडून शिवबंधन बांधले आणि उमेदवारी मिळविली आहे.  

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने बुधवारी सकाळी १६ उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यात मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने पिंपरी चिंचवडमधील माजी महापौर संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मावळ लोकसभा मतदार संघात पुणे जिल्ह्यातील तीन आणि रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. लोकसभा आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारी जाहीर होणे थांबले होते. महाविकास आघाडीने आजच वाघेरे यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीचा उमेदवार अजूनही ठरला नाही.

दादा- साहेबांना रामराम

पिंपरी चिंचवड मधील राजकारणात वाघेरे कुटुंबाचे स्थान आहे. भिकू वाघेरे हे महापौर होते. त्यांच्या निधनानंतर चिरंजिव संजोग वाघेरे यांनी पिंपरीचे नेतृत्व  केले. १९९५ मध्ये महापौर पद भूषविले. त्यांच्या पत्नी उषा वाघेरे या माजी नगरसेवक होत्या. तसेच स्थायी समितीच्या सभापतीपद भूषविले आहे. संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. माजी महापौर आणि राष्ट्रवादीच्या प्रतिकूल कालखंडात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली. अर्थात हे कुटुंब शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ होते.

म्हणून शिवबंधन मावळ लोकसभेची निर्मिती २००९ मध्ये झाली. तेव्हापासून वाघेरे मावळसाठी इच्छुक होते. २०१४ ला तयारीही केली होती. मात्र, ऐनवेळी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी दिली. २०२४ ला राजकीय समीकरण बदलले. अजित पवार गट महायुतीत गेला. तर शरद पवार महाविकास आघाडीतच राहिले. मावळची जागा ही महाविकास आघाडीत शिवसेनेची होती. त्यामूळे वाघेरे यांना पक्ष सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. वाघेरे यांनी सुरुवातीला २५ डिसेंबरला मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानतंर ३० डिसेंबर २०२३ ला राष्ट्रवादीला रामराम ठोकून त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केले होता. शिवबंधन बांधले. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या मेळाव्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी वाघेरे यांच्या उमेदवारीचे सुतावोच केले होते. त्यानंतर दुसऱ्या यादीत वाघेरे यांचे नाव जाहीर झाले.

 

टॅग्स :PuneपुणेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारsanjog waghere patilसंजोग वाघेरे पाटीलshrirang barneश्रीरंग बारणेmaval-pcमावळlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४