शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

पाथरगाव खिंडीत वाळूचा ट्रक पलटी,एक तास वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 20:28 IST

पुणे मुंबई महामार्गावर पाथरगाव खिंडीत गावातील रस्त्यावरून रिव्हर्सने आलेला एक वाळूने ( क्रसेंट ) भरलेला ट्रक महामार्गावर येवून पलटी झाला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र एक तास वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

कामशेत : पुणे मुंबई महामार्गावर पाथरगाव खिंडीत गावातील रस्त्यावरून रिव्हर्सने आलेला एक वाळूने ( क्रसेंट ) भरलेला ट्रक महामार्गावर येवून पलटी झाला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र एक तास वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार (दि.१२) रोजी सव्वा अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कामशेत हद्दीतील महामार्गाच्या जवळ पाथरगावाकडे वाळूने भरलेला ट्रक (क्र. एम एच १२ सी टी ८०४३) हा चढावरून गावाच्या दिशेने जात जात होता. तो चढ चढू शकला नसल्याने ट्रक ड्रायव्हरला वाहनावर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे ट्रक उताराने मागे येऊन गावाच्या रस्त्यावरून थेट पाथरगाव खिंडीमध्ये पुणे मुंबई लेन महामार्गावर पलटी झाला. यावेळी ट्रक चालकाने ट्रक मधून वेळीच उडी मारल्याने तो बचावला आहे. सुदैवाने यावेळी महामार्गावर एकही वाहन नसल्याने मोठा अपघात घडला असता. काही दिवसांपूर्वीच तळेगाव लिंबफाटा येथे एक हायवा दुचाकीवर पलटी होवून एका तरुणाचा हकनाक बळी तर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. याच घटनेची पाथरगाव खिंडीत पुनरावृत्ती झाली असती. मात्र सुदैवाने महामार्गावर ट्रक पलटी होत असताना एकही वाहन नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.  अपघातग्रस्त वाहनामुळे पुणे मुंबई लेनवर सुमारे एक तास बंद होती. महामार्गावर वाळूचा ढिग पसरून ट्रक उलटा पडला होता. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. कामशेत पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरु करून आयआरबी कर्मचारी व क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला केले. तसेच अपघातग्रस्त ट्रकचे रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवर क्रसेंट टाकून साफ करून साडे बारा वाजण्याच्या सुमारास महामार्गाची लेन वाहतुकीस खुली केली.

टॅग्स :Accidentअपघातkamshetकामशेतkamshet tunnelकामशेत बोगदा