संभाजींचे चरित्र दिव्य आविष्कार

By Admin | Updated: February 15, 2016 01:26 IST2016-02-15T01:26:07+5:302016-02-15T01:26:07+5:30

छत्रपती संभाजीराजांचे चरित्र आणि चारित्र्य म्हणजे छात्रतेजाचा दिव्य आविष्कार आहे, असे प्रतिपादन बारामती येथील ज्येष्ठ विचारवंत प्रा. राज मालेगावकर यांनी केले.

Sambhaji's character divine invention | संभाजींचे चरित्र दिव्य आविष्कार

संभाजींचे चरित्र दिव्य आविष्कार

चिंचवड : छत्रपती संभाजीराजांचे चरित्र आणि चारित्र्य म्हणजे छात्रतेजाचा दिव्य आविष्कार आहे, असे प्रतिपादन बारामती येथील ज्येष्ठ विचारवंत प्रा. राज मालेगावकर यांनी केले.
सिद्धिविनायक मंदिर प्रांगण, संभाजीनगर, चिंचवड येथे स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळ आयोजित सिद्धिविनायक व्याख्यानमालेतील ‘छत्रपती संभाजी राजांची शौर्यगाथा’ या विषयावर प्रा. मालेगावकर बोलत होते. यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख योगेश बाबर, माजी नगरसेवक मधुकर बाबर, नारायण देशपांडे, संजय ढेबरे, बजरंग गडदे, शैलेश मोरे, अजय जाधव, गोपीचंद जगताप, प्रदीप प्रमुख उपस्थित होते.
फ्रेंच प्रवासी अ‍ॅबे कॅरे, ईस्ट इंडिया कंपनीचे डॉक्टर जॉन फायर, अभ्यासक हेन्री आॅक्सिंडन, इतिहासकार थॉमस निकोलस, मोगल बखरकार खाफीखान, सेतू माधवराव पगडी, वा. सी. बेंद्रे असे अनेक इतिहासकारांचे दाखले देत, ऐतिहासिक पत्रांचे सनावळ्यांसह संदर्भ उद््धृत करीत त्यांनी ओघवत्या वक्तृत्वाने सुमारे दीड तास श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. व्याख्यानापूर्वी किसन खंडकर या युवकाने, तसेच अरिहंत जेधे या पाचवर्षीय मुलाने योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. मालेगावकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद वाडकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Sambhaji's character divine invention