शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत-नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे सहायक अनुदान प्राप्त न झाल्याने मागील दोन महिन्यांपासून रखडले वेतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:52 IST

- कर्मचाऱ्यांचा गेल्या दोन महिन्यांपासून वेतन प्रलंबित, अनुदान मंजूर करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

देहूगाव : राज्यातील बहुतेक नगरपंचायती व नगरपरिषदांच्या कर्मचाऱ्यांचे पगारासाठी आवश्यक असलेले सहाय्यक अनुदान प्राप्त न झाल्याने मार्च व एप्रिल महिन्याचे पगार रखडले आहे. त्यामुळे महिन्याचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. तसेच कर्जाचे हप्ते, शाळेची फी वेळेत न गेल्याने कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

नगरपंचायती व नगरपरिषदांमधील महिन्याचे आर्थिक नियोजन कोलमडल्याने नगरपंचायतीचे कर्मचारी चिंताग्रस्त. कर्मचाऱ्यांचे थेट शासनाकडून पगार होत नसून त्यासाठी स्वतंत्रपणे निधी (सहायक अनुदान) उपलब्ध करून दिला जातो. त्यामधून या कर्मचाऱ्यांचा पगार केला जातो. मात्र मार्च व एप्रिल महिन्यात येणारे सहायक अनुदान अद्यापपर्यंत प्राप्त झाले नाही.सहायक अनुदान अद्याप नाही मिळालेवेतनासाठी आवश्यक असणारे मार्च व एप्रिल महिन्याचे सहायक अनुदान अद्यापपर्यंत प्राप्त झालेले नसल्याने हे पगार रखडलेले आहेत. कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. ही अडचण लक्षात घेता शासनाने तातडीने दखल घेऊन अनुदान मंजूर करावी, अशी मागणी संवर्ग अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व सफाई कर्मचारी यांनी केली आहे.

ज्या नगरपंचायती व नगरपरिषदांची आर्थिक स्थिती मजबूत आहे, त्या नगरपंचायतीच्या व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे पगार झालेले आहेत. जेव्हा अनुदान प्राप्त होईल तेव्हा ती रक्कम पुन्हा त्या खात्यावर वळविली जाते. मार्च महिन्याच्या सहायक अनुदानाची फाईल नगरविकास विभागाकडून वित्त विभागाकडे गेली असल्याचे समजते. लवकरच पगार होण्याची शक्यता आहे.- सुनील गोर्डे, अध्यक्ष, पुणे विभाग, महाराष्ट्र राज्य संवर्ग अधिकारी संघटना

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMumbaiमुंबईPuneपुणेBribe Caseलाच प्रकरण