बदल्या रद्दसाठी धावाधाव
By Admin | Updated: July 9, 2016 03:53 IST2016-07-09T03:53:53+5:302016-07-09T03:53:53+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेत बदल्यांचा धडाका सुरूच आहे. गुरुवारी ५० मुख्य लिपिक, तसेच ७३ लिपिकांच्या बदल्या करण्यात आल्या. तर शुक्रवारीही ५८ शिपाई आणि २५ मजुरांच्या

बदल्या रद्दसाठी धावाधाव
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत बदल्यांचा धडाका सुरूच आहे. गुरुवारी ५० मुख्य लिपिक, तसेच ७३ लिपिकांच्या बदल्या करण्यात आल्या. तर शुक्रवारीही ५८ शिपाई आणि २५ मजुरांच्या एकाच दिवशी बदल्या करण्यात आले. बदल्यांचे आदेश निघताच मर्जीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली आहे.
शिपाई पदावरील ५८ जणांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये करसंकलन विभागातील सर्वाधिक २४ जणांचा समावेश आहे. यासह माध्यमिक शिक्षण विभागातील नऊ जणांची, स्थानिक संस्था कर विभागातील सहा जणांची इतर विभागात बदली करण्यात आली. तसेच वायसीएमएच, वैद्यकीय विभाग, नगर सचिव या विभागातील शिपायांच्याही बदल्या केल्या.
यासह २५ मजुरांच्याही बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक वायसीएमएच रुग्णालयातील सात जणांच्या बदल्यांचा समावेश आहे. तसेच ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय आणि उद्यान विभागातील प्रत्येकी तीन जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासह अ, ड, इ क्षेत्रीय कार्यालय, तसेच भूमी आणि जिंदगी, अभिलेख कक्ष, क्रीडा विभाग, नागरवस्ती विकास योजना या विभागातील मजुरांच्याही बदल्या करण्यात आल्या. या बदल्या
करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना
११ जुलैपर्यंत बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
- अनेक कर्मचारी हे पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक आहेत. तर काही कर्मचारी पदाधिकाऱ्यांच्या खास मर्जीतील आहेत. बदल्यांबाबत समजताच संबंधित कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. बदली रद्द करावी, अमुक ठिकाणी बदली नको, अशी गळ घातली. पदाधिकारीदेखील कर्मचाऱ्यांची बदली रद्द करण्याबाबत संबंधितांकडे येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.