शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना डॉक्टर भरतीच्या प्रस्तावाचे नाही गांभीर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 12:44 IST

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने डॉक्टर आणि रुग्णालयाची कमतरता आहे...

ठळक मुद्देसभा तहकुबीचा डाव : विधी समितीच्या विषयाला खो

पिंपरी : कोरोनाचे संकट असताना डॉक्टरांची कमतरता आहे. मात्र, महापालिकेतील सत्ताधाºयांना या विषयाचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. सर्वसधारण सभेच्या पटलावर विषय नसल्याने येत्या १९ जूनला सभा होणार नाही. अजेंडा तयार करण्यासाठी अवधी कमी राहिल्याचे कारण देऊन विधी समितीने मंजूर केलेला विषयही सभेच्या पटलावर आणण्यात अपयश आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने डॉक्टर आणि रुग्णालयाची कमतरता भासण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने डॉक्टर भरतीचा प्रस्ताव महापालिकेच्या विधी समितीपुढे ठेवला. मात्र, अर्थकारणासाठी तीन महिने हा प्रस्ताव थांबवून ठेवला होता. याबाबत ' लोकमत'ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर विधी समितीने हा विषय मंजूर केला. त्यानंतर हा विषय १९ जूनच्या सर्वसाधारण सभेच्या पटलावर येणे अपेक्षित होते. मात्र, अजेंडा तयार करण्यासाठी लागणारा अवधी पुरेसा नसल्याचे कारण नगरसचिव कार्यालयाने दिले आहे. तसेच महिन्यात एक सभा घेण्याचा नियम आहे. या महिन्यात पाच सर्वसाधारण सभा झाल्या आहेत. जूनची सभा झाल्याने शुक्रवारची सभा होणार नाही.----------१९ जूनची सभा तहकुबीची शक्यता... ९ जूनच्या विधी समितीने डॉक्टर भरतीचा विषय मंजूर करणे अपेक्षित होते. मात्र, अर्थिक कारणासाठी विधी समितीने हा विषय १२ जूनपर्यंत तहकूब केल्याची चर्चा होती. त्यानंतर विरोधकांनी टीका केल्याने शुक्रवारच्या बैठकीत हा विषय मंजूर केला. मात्र, विषयपत्र तयार करण्याची मुदत संपल्याने १९ जूनच्या नियोजित सभेसमोर हा विषय आलेला नाही. मात्र, कोरोनाच्या काळात तातडीचा विषय म्हणून ते घेऊ शकतात. मात्र, ही सभा तहकूब करण्याचा डाव असल्याची चर्चा आहे.  ................ महिन्यात एक सभा घ्यावी, असा नियम आहे. जून महिन्यात पाच सभा झाल्या आहेत. डॉक्टरांचा विषय १२ जूनला विधी समितीने मंजूर केला. तर अजेंडा तयार करण्याची मुदत ही ११ जून होती. तसेच १९ जूनला सभा घेण्याचे नियोजन होते. मात्र, या महिन्यातील सभा कधी घ्यायची, याबाबत महापौर आणि सत्तारूढ पक्षनेते निर्णय घेतील.उल्हास जगताप, नगरसचिव

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर