आरटीई २५ टक्के प्रवेश अखेर सुरू
By Admin | Updated: April 14, 2016 02:12 IST2016-04-14T02:12:18+5:302016-04-14T02:12:18+5:30
आरटीई २५ टक्के प्रवेशाला अखेर मुहूर्त मिळाला. आरटीई प्रवेशास अकरा शाळांनी विरोध केला होता. शाळांनी प्रवेशास मान्यता दर्शविल्यानंतर आरटीई प्रवेश बुधवारी सुरू झाला आहे.

आरटीई २५ टक्के प्रवेश अखेर सुरू
निगडी : आरटीई २५ टक्के प्रवेशाला अखेर मुहूर्त मिळाला. आरटीई प्रवेशास अकरा शाळांनी विरोध केला होता. शाळांनी प्रवेशास मान्यता दर्शविल्यानंतर आरटीई प्रवेश बुधवारी सुरू झाला आहे.
आरटीई प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी, पालकांची गैरसोय होऊ नये, याकरिता शिक्षण मंडळ प्रशासनाने शहरातील दहा ठिकाणी प्रवेश सुरू केले आहेत. विशेष म्हणजे सुटीच्या दिवशीही १४ व १५ एप्रिलला आरटीई प्रवेश सुरू राहणार आहेत.
भोसरीतील संत साई इंग्लिश स्कूल, दिघीतील हॉरिझन स्कूल, आकुर्डीतील बीना इंग्लिश मीडिअम स्कूल, शाहूनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल, मोरवाडीतील एसएनबीपी स्कूल, पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालय, पिंपळे गुरवमधील किलबिल इंग्लिश मीडिअम स्कूल, सांगवीतील एम. एस. कीड्स, वाकडमधील एस. पी. स्कूल, काळेवाडीतील एम. एम. विद्यामंदिर या ठिकाणी प्रवेश सुरू झाले आहेत.
पालकांनी प्रवेशास येताना कागदपत्रांची पूूर्ण पडताळणी करणे आवश्यक आहे. पूर्ण कागदपत्रे उपलब्ध नसल्यास प्रवेशास अडचण निर्माण होत आहे. (वार्ताहर)
आरटीईचे कामकाज पाहण्यासाठी मदत केंद्रावर संपर्क अधिकारी व समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांचीही नेमणूक के ली आहे. तसेच नियंत्रण अधिकारी म्हणून सहायक प्रशासन अधिकारी काम पाहणार आहेत. आरटीई वेबसाइटवर अधिक माहितीसाठी अधिकारी व संपर्क अधिकाऱ्यांचे मोबाइल नंबर दिले आहेत.