रोडरोमिओंचा पोलिसांना झटका
By Admin | Updated: November 26, 2015 00:51 IST2015-11-26T00:51:08+5:302015-11-26T00:51:08+5:30
भरधाव वेगात बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्या चालकाला अडविण्याचा प्रयत्न करीत असताना चालकाने पोलीसांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला.

रोडरोमिओंचा पोलिसांना झटका
पिंपरी : भरधाव वेगात बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्या चालकाला अडविण्याचा प्रयत्न करीत असताना चालकाने पोलीसांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला.यामध्ये वाहतूक विभागाचे दोघे कर्मचारी जखमी झाले. ही घटना निगडी येथे घडली असून, अशीच दुसरी घटना सांगवी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनी वामन काळोखे (वय २०, रा.विठ्ठलवाडी, देहूगाव) हा मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ( एमएच १४,डीएन ८७९७) या मोटारीत सीटबेल्ट न लावता आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निक महाविद्यालयासमोर भरधाव वेगाने वेडी-वाकडी गाडी चालवीत होता. वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी निवृत्ती रेंगडे व सरोदे यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. त्याने मोटार न थांबवता थेट पोलिसांच्याच अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.
तसेच दुसऱ्या घटनेत सांगवी येथील एम.एस.काटे चौकातील रस्त्यावर मध्यरात्री १२ च्या सुमारास आरोपी सूरज जाधव (वय २३, रा. विनायकनगर, सांगवी) व प्रशांत राऊत (वय ३८,रा. रहाटणी चौक,काळेवाडी) हे दारू पीत होते. सावळकर यांनी पोलिसांनी हुज्जत घातली. याबाबत गुन्हे दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)