शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये रोडरोमिओ पोलिसांच्या रडारवर; शाळा, महाविद्यालय परिसरात गस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 21:23 IST

रोडरोमिओ पोलिसांच्या रडारवर...

पिंपरी : शाळा व महाविद्यालय परिसरात महिला व विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून गस्त घालण्यात येणार आहे. तसेच असे प्रकार दिसून आल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे. त्यामुळे शाळा व महाविदयालय परिसरात रेंगाळणारे तसेच रोडरोमिओ पोलिसांच्या रडारवर आले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीम महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासह खासगी अनुदानित व विना अनुदानित शाळा मोठ्या संख्येने आहेत. तसेच महाविद्यालये देखील आहेत. त्यात विद्यार्थीनींची संख्या लक्षणीय आहे. शाळा, महाविद्यालय भरताना आणि सुटताना परिसरात मोठी गर्दी होते. यात काही तरुण व नागरिक रेंगाळतात. तसेच काही टवाळखोरांचाही वावर तेथे असतो. त्यांच्याकडून विद्यार्थीनी तसेच महिलांची छेड काढण्याचा प्रकार होतो. यातील काही प्रकरणे पोलिसांकडे येतात. गुन्हा दाखल करून कारवाई केली जाते. मात्र, असे प्रकार घडूच नयेत यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालय परिसरात पोलिसांची गस्त घालण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

छेडछानीच्या घटना किंवा काही अनुचित प्रकार देखील त्यामुळे रोखता येणार आहेत. अशा घटना रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे आणि ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर तसेच पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ०२०-२७३५२५०० या क्रमांकावर फोन करून किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस