नृत्याविष्काराला रसिकांची दाद

By Admin | Updated: February 17, 2016 00:48 IST2016-02-17T00:48:35+5:302016-02-17T00:48:35+5:30

महापालिका कला व क्रीडा योजनांतर्गत कथक व भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यांचा कार्यक्रम निगडी प्राधिकरण येथे मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञान प्रबोधिनी शाळा येथे झाला.

Rituals of racist racers | नृत्याविष्काराला रसिकांची दाद

नृत्याविष्काराला रसिकांची दाद

पिंपरी : महापालिका कला व क्रीडा योजनांतर्गत कथक व भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यांचा कार्यक्रम
निगडी प्राधिकरण येथे मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञान प्रबोधिनी शाळा येथे झाला.
सर्व कलाकारांचा अप्रतिम नृत्याविष्कार, रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व शिस्तबद्ध नियोजन यांमुळे कार्यक्रम दर्जेदार झाला. नर्तक व संगीत अकादमीचे मानद सल्लागार डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. सहकार्य स्मिता देशमुख यांनी केले. अभियंता सुरेखा कुलकर्णी यांनी निवेदन केले.
प्रारंभी कथकक्वीन सितारादेवी यांच्या प्रतिमेचे हार घालून पूजन करण्यात आले. या वेळी रंगमंचावर त्यांच्या कन्या जयंती माळा, नात रिषिका मिश्रा, भाचे रवी कृष्ण, डॉ. पं. नंदकिशोर कपोते, परिमल फडके, तेजस्विनी साठे, अमिरा पाटणकर आदी कलाकार उपस्थित होते.
पद्मिनी सोनवणे, राजश्री धोंगडे, अक्षता मोहिते, निधीकट्टी, मुक्ता पुजारी, प्राची पाचघरे या कलाकारांनी कथकनृत्य, तर चिप्पीपद्म कुमार, कीर्ती नायर, गायत्री नंबोथिरी, अतिराक्षीकुमार, अंजली जयन यांनी भरतनाट्यम नृत्य सादर केले. तेजस्विनी साठे यांनी देवीस्तुती, ठुमरी तसेच अमिरा पाटणकर, अवनी गद्रे, सावनी मोहिते, शिवाजी करमरकर, केतकी साठे यांनी कृष्णवंदना, गोवर्धन लीला व तीनतालात कथकनृत्य सादर केले. गुरू परिमल फडके, सई शेटे, मानसी लेले, नेहा मुजुमदार, अभिज्ञा अत्रे, मधुमिता साठे यांनी भरतनाट्यम नृत्याद्वारे सप्तस्वर व शिवतांडव उत्कृष्टरीत्या सादर केले.(प्रतिनिधी)

Web Title: Rituals of racist racers