शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

भांडणाची तक्रार देण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकाचा म्हाळुंगेत खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 19:52 IST

ओळखीच्या व्यक्तिशी झालेल्या भांडणाची तक्रार देऊन येतो, असे सांगून घरातून गेलेल्या रिक्षाचालकाचा खून झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह म्हाळुंगे येथील शितळादेवी नगर परिसरात मिळून आला.

हिंजवडी : ओळखीच्या व्यक्तिशी झालेल्या भांडणाची तक्रार देऊन येतो, असे सांगून घरातून गेलेल्या रिक्षाचालकाचा खून झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह म्हाळुंगे येथील शितळादेवी नगर परिसरात मिळून आला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार तानाजी कसबे (वय २८, रा. म्हाळुंगे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी राणी कुमार कसबे (वय २५, रा. म्हाळुंगे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश महेंद्र सोस्टे (वय ४४, रा. बाणेर) व त्यांच्या साथीदांरा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

कुमार कसबे रिक्षाचालक होते. त्यांची व राकेश सोस्टे याची ओळख होती. शनिवारी (दि. २०) रात्री नऊच्या सुमारास कुमार कसबे दुचाकीवरून कामानिमित्त बाहेर गेले होते. ते दुसऱ्या दिवशी दुपारी घरी परतले. याबाबत पत्नी राणीनी विचारले असता, बाणेर येथे राकेश बरोबर माझे भांडण झाले आहे. त्याने व त्याच्या साथीदारांनी मला मारहाण करून रात्रभर डांबून ठेवले होते. माझ्या डोक्यात मुंग्या येत आहेत, मी त्याच्या नावाची तक्रार द्यायला जाणार आहे, असे कुमार यांनी पत्नी राणी यांना सांगितले. पत्नी राणी यांच्याकडून चिकन आणण्यासाठी ५०० रुपये घेऊन रविवारी (दि. २१) साडेचार वाजता ते घरातून गेले. ते रात्रभर घरी परतले नाही, मात्र त्यांचा मृतदेह दुसऱ्या  दिवशी सोमवारी (दि. २२) म्हाळुंगे येथील शितळादेवी नगर परिसरात मिळून आला. हिंजवडी पोलीस तपास करत आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीauto rickshawऑटो रिक्षा