शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

उलट दिशेने वाहन चालविणारे पकडल्यास पोलिसांना बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 01:26 IST

वाहनचालकांना शिस्त लावण्याच्या उपाययोजना अमलात आणल्या जात आहेत. उलट दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष वेधले आहे.

पिंपरी : वाहनचालकांना शिस्त लावण्याच्या उपाययोजना अमलात आणल्या जात आहेत. उलट दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष वेधले आहे. भारतीय दंडसंहिता कलम २७९ चा आधार घेऊन अशा वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे. उलट दिशेने वाहन चालविणाºया वाहनचालकांना पकडूनकारवाई करणाºया पोलीस कर्मचाºयांसाठी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी बक्षीस योजना जाहीर केली आहे. दुचाकी पकडल्यास १०० रुपये, चारचाकी पकडल्यास ५०० रुपये अशा स्वरुपाची ही बक्षीस योजना आहे.वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून विरुद्ध दिशेने वाहन चालवून अपघाताला आमंत्रण देणारे, स्वत:सह दुसºयांच्या जिवाला धोका निर्माण करणाºयांना शिस्त लावण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी सप्टेंबर २०१८ ला कठोर भूमिका घेतली. सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यात उलट दिशेने वाहन चालविणाºयांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली. उलट दिशेने निष्काळजीपणे वाहन चालवून धोकादायक परिस्थिती निर्माण करणाºया वाहनचालकांवर भारतीय दंडसंहिता कलम २७९ प्रमाणे गुन्हा दाखल करा, असे आदेश आयुक्तांनी दिले. त्यानंतर कारवाईची मोहीम सुरू झाली. सुमारे साडेसहाशे वाहनचालकांवर कारवाईसुद्धा झाली. मध्यंतरी ही मोहीम थोडी थंडावली होती. पुणे शहर पोलिसांनी नोव्हेंबरमध्ये हेल्मेट सक्तीची मोहीम पुन्हा अमलात आणली. त्या वेळी आयुक्त पद्मनाभन यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये पुण्याप्रमाणे हेल्मेट सक्तीची मोहीम राबविणार नसल्याचे स्पष्ट केले. दुचाकी वाहनचालकांना स्वत:चे संरक्षण करण्याच्या दृष्टीने हेल्मेट वापरणे महत्त्वाचे ठरते. परंतु उलट दिशेने वाहन चालविणारे स्वत:सह दुसºयाच्या जिवीताला धोका निर्माण करतात. उलट दिशेने वाहन चालविणाºयांवर कारवाई होते, त्या वेळी हेल्मेट, नंबरप्लेट, विमा, प्रदूषणाबाबतचे प्रमाणपत्र याबाबतही चौकशी करून माहिती घेतली जाते. असे आयुक्तांचे म्हणणे आहे. वाहतूक पोलीस जेवढ्या बेश्स्ति वाहनचालकांवर कारवाई करतील, तेवढ्या प्रमाणात त्यांना बक्षिसाची रक्कम मिळेल, अशी ही योजना असल्याने वाहतूक पोलीस बेशिस्त वाहनचालकांना पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत.दंडासह कारावासाच्या शिक्षेची तरतूदउलट दिशेने वाहन चालविणाºया वाहनचालकाला भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ नुसार विशिष्ट कालावधीसाठी कारावासाची शिक्षा सुनावली जाते. त्यात सहा महिन्यांपर्यंत वाढ करण्याची तरतूद आहे. कारावास आणि एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. अपघात घडला तरच गुन्हा दाखल होईल, असे नाही.धोकादायक परिस्थिती निर्माण केल्याच्या कारणावरूनसुद्धा उलटदिशेने येणाºया वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. वाहतूक पोलीस शक्यतो मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करतात. मात्र उलट दिशेने वाहने चालविणाºयांविरुद्ध मोटार वाहन कायद्याऐवजी भारतीय दंड संहिता कलम २७९ नुसार कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस