शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

हौशी चालकांमुळे आरटीओची कोटींची उड्डाणे, ‘चॉईस नंबर’मधून महसूलप्राप्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 01:39 IST

नवीन दुचाकी व चारचाकी वाहन घेतले, तर आवडीचा नंबर मिळावा, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. काही हौशी वाहनचालक वाहनाच्या किमतीइतकेच किंवा त्यापेक्षा अधिक पैसे पसंतीच्या क्रमांकाला मोजतात.

- प्रकाश गायकरपिंपरी : नवीन दुचाकी व चारचाकी वाहन घेतले, तर आवडीचा नंबर मिळावा, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. काही हौशी वाहनचालक वाहनाच्या किमतीइतकेच किंवा त्यापेक्षा अधिक पैसे पसंतीच्या क्रमांकाला मोजतात. या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांमध्ये ११ कोटी ८३ लाख ५० हजार रुपये इतका महसूल उपप्रादेशिक कार्यालयाच्या (आरटीओ) तिजोरीत जमा झाला आहे.आवडीचा वाहन क्रमांक घेणाऱ्यांमध्ये वर्षागणिक वाढ होत आहे. त्यासाठी जादा पैसे मोजण्याची तयारीही वाहनमालक दाखवत आहे. काही दुचाकीमालकही आवडीच्या नंबरसाठी जादा पैसे मोजतात.या आकर्षक नंबरसाठी २० ते ३० हजार रुपये ते खर्च करतात. हौसेला मोल नसते या उक्तीप्रमाणे वाहनचालकांच्या हौसेपोटी कोट्यवधी रुपयांचा महसूल आरटीओमध्ये जमा होत आहे.मुहूर्तावर सर्वाधिक महसूलआॅक्टोबर (दसरा) आणि नोव्हेंबरमध्ये (दिवाळी) सर्वाधिक महसूल जमा झाला आहे. आॅक्टोबरमध्ये १ कोटी ७६ लाख ५८ हजार ५००, तर नोव्हेंबर महिन्यामध्ये १ कोटी १० लाख ७९ हजार ५०० इतका महसूल चॉईस नंबरमधून जमा झाला आहे. आॅक्टोबर महिन्यामध्ये २०५४ जणांनी चॉईस नंबरसाठी अर्ज केला होता. जानेवारी महिन्यामध्ये कमी म्हणजे ५६ लाख ९२ हजार ५०० रुपये महसूल जमा झाला. चॉईस नंबरमुळे तिजोरीत मोठ्या प्रमाणात भर पडलीआपल्या वाहनाचा नंबर आकर्षक असावा, वाहन क्रमांकातून ठरावीक तारीख ध्यानात यावी, तसेच अमुक एखादा नंबर ‘लकी’ आहे, या समजुतीतून ‘चॉईस नंबर’ घेतला जातो. त्यासाठी वाहनाच्या किमतीपेक्षाही जास्त किंमत मोजण्यास वाहनमालक तयार होतात. - आनंद पाटील,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी४७४७, ४९१२ अशा क्रमांकासाठी ५० हजार रुपये मोजले जातात. ०००१ या क्रमांकासाठी तर सात लाख रुपये मोजण्यात आले आहेत. सर्वाधिक पसंतीच्या क्रमांकांमध्ये ९००, ०९९९, ७७७७ यांचा समावेश आहे. त्यासाठी वाहनचालक किमान दोन लाख रुपये खर्च करीत आहेत.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड