सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

By Admin | Updated: April 1, 2017 01:51 IST2017-04-01T01:51:39+5:302017-04-01T01:51:39+5:30

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या

Retired officers, employees felicitate | सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या एकूण २६ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे आदींच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, सेवाउपदान व अंशराशीकृत धनादेश सुपूर्द करुन सन्मान करण्यात आला.
स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर मोरे स्थायी समिती सभापती सावळे, नगरसस्या आशा शेंडगे, शर्मिला बाबर, नगरसदस्य नामदेव ढाके, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, प्रशासन अधिकारी राजेश आगळे, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी चारुशीला जोशी आदी उपस्थित होते.
महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये प्रशासन अधिकारी विठ्ठल बेंडे, कार्यालयीन अधिक्षक प्रकाश देशमाने, दत्तात्रय उनकुले, कृष्णानंद अंकोलीकर, मुख्य लिपिक जमाल पानसरे, प्रमोद थोरवे, लिपिक तुकाराम फुलवरे, मुकादम बाळू जोशी, उद्यान कर्मचारी अशोक साठे, फ क्षेत्रीय मुख्य कार्यालय कर्मचारी प्रकाश बाबर यांचा समावेश आहे.
स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्यांमध्ये मुख्य लिपीक किसन गोडे, अनिल शेटिया, आरोग्य कर्मचारी सुरेश शिंदे, नामदेव राखपसरे, दस्तगीर पठाण, ओमी वाल्मिकी, मंगला ढमढेरे, नंदा गायकवाड, शोभा बारवेकर, विलास माने, गंगा गायकवाड, देवगुनाबाई वाघमारे, झुबेदा सय्यद, सुमन भोसले, लिलाबाई हरेल, कैलास भांडे यांचा समावेश आहे. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी आणि सुत्रसंचालन रमेश भोसले यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Retired officers, employees felicitate