पिंपरी : चिंचवडगाव ते लिंक रस्तामार्गे पिंपरी आणि मोरवाडीतून शगून चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. नागरिकांच्या सूचना व हरकती मागवून त्यानुसार पुणे शहर वाहतूक शाखेने शगून चौकाकडे जाणाºया मार्गावरील वाहतुकीसाठी काही निर्बंध घातले आहेत.वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश पुणे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिले आहेत. पिंपरी बाजारपेठेच्या मार्गावरील वाहतूककोंडी ही नागरिकांसाठी नित्याचीच समस्या बनली आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी पिंपरी बाजारपेठ, मंडई आदी ठिकाणी मालवाहू मोटारी आणि नागरिकांच्या मोटारी, दुचाकी येत असल्याने नागरिकांना पायी चालण्यास जागा उरत नाही. वाहतूक नियमनासाठी स्वतंत्र पोलीस तैनात ठेवूनही वाहतूककोंडीवर नियंत्रण आणणे शक्य होत नव्हते. त्यामुळे उपाययोजना नेमक्या काय करता येतील, याबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. त्यानंतर उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. पिंपरी वाहतूक पोलिसांना उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.सम-विषम तारखांना पार्किंगपिंपरी कॅम्प बाजारपेठेत जणाºया मार्गावर भाटनगर कॉर्नर ते शगून चौक रस्त्याच्या दोन्ही बाजूस पी-१ आणि पी-२ अर्थात सम आणि विषयम तारखांना दुचाकी वाहने पार्किंग करण्यास मुभा दिली आहे. त्या त्या ठिकाणीच वाहने उभी करावी लागणार आहेत. सम-विषम तारखेच्या पार्किंग नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.नो पार्किंगची ठिकाणे निश्चितरेंटेंड क्वार्टर्स ए-६ इमारतीच्या बाजूला ३ फूट रूंद आणि ३० मीटर लांबपर्यंत दुचाकींसाठी पार्किंग सुविधा असेल, रेंटेंड क्वार्टर्स ए -७ इमारतीच्या बाजूला ३० मीटर लांबपर्यंत नो पार्किंग करण्यात आले आहे. तसेच रेंटेंड क्वार्टर्स ए-७ ते १२, १३ आणि १६ या इमारतींच्या गल्लीत नो पार्किंग करण्यात आले आहे.तीन, चारचाकी वाहनांना बंदीपिंपरी मुख्य बाजारपेठेत जाण्यास तीन आणि चार चाकी वाहनांना सकाळी ९ ते १२ आणि सांयकाळी ५ ते ९ या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे. अत्यंत वर्दळीच्या वेळी बाजारपेठेत तीन आणि चार चाकी वाहने सोडली जाणार नाहीत. विशिष्ट वेळेत मोठ्या वाहनांना बाजारपेठेत मज्जाव केल्यास वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल.
भाटनगर ते शगूनपर्यंत निर्बंध, सम-विषम तारीख : ३० मीटरपर्यंत नो पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:35 IST