शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मोरवाडीतील मेट्रो स्टेशनला धनगर समाजातील नागरिकांचा विरोध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 16:36 IST

मेट्रो स्टेशन कामामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचा दर्शनी भाग झाकला जात आहे.

ठळक मुद्देस्टेशनची उंची पुतळ्याचे वर सुमारे २.५० मीटर असणार मेट्रोच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन नियोजनापुर्वी आराखडा दाखविण्याची विनंती कोणतीही पुर्व कल्पना न देता मेट्रो स्टेशनचा आराखडा अंतिम करुन समाजावर अन्याय

पिंपरी:  मोरवाडीतील मेट्रो स्टेशनचा आराखडयास धनगर समाजातील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे, हा आराखडा बदलण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका आशा शेंडगे यांनी केली आहे.मेट्रो रेल कॉर्पोरेशन मार्फत पिंपरी चिंचवड मनपा हद्दीमध्ये दापोडी ते एम्पायर इस्टेट पुलापर्यंत काम करण्यात येत आहे. या कामामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक , पिंपरी येथे मेट्रोचे स्टेशन बांधण्याचे काम चालु आहे. स्टेशन कामामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचा दर्शनी भाग झाकला जात आहे.या आराखड्यास विरोध दर्शविला आहे.  दरम्यान महापालिकेच्या बीआरटीएस विभागाने धनगर समाजाचे पदाधिकारी यांच्यात मेट्रोस्टेशनच्या आराखड्याचे सादरीकरण केले होते. महापालिका भवनातील कै. आण्णासाहेब मगर यांचा पुतळा व मनपाचे इमारतीचे इलेव्हेशन अबाधित ठेवण्यासाठी मेट्रो स्टेशन  होळकर यांचे पुतळ्याकडे स्थलांतरीत केले आहे. स्टेशनचा जिना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकाचे पिंपरीचे बाजुकडील रस्त्याने सुरु होत आहे. स्टेशनचा काही भाग पुतळ्याचे वर येत असुन स्टेशनची उंची पुतळ्याचे वर सुमारे २.५० मीटर असणार आहे. स्टेशनमुळे पुतळा झाकला जाऊन पुतळ्यावर संपुर्ण सावली पडणार आहे. मेट्रोचा खांब पुतळ्याच्या समोर येणार आहे. यामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्यापुतळ्याचे सौंदर्यामध्ये अडथळा येणार आहे, या बाबी सदस्यांनी बैठकीत मांडल्या होत्या. याबाबत नगरसेविका आशा शेंडगे- धायगुडे यांनी मेट्रोचे अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. धायगुडे म्हणाल्या, आमचा  मेट्रो कामाला विरोध नाही परंतु मेट्रो स्टेशनचे बांधकाम करण्यासाठी मेट्रोच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन नियोजनापुर्वी आराखडा दाखविणेची विनंती केली होती. परंतु याबाबत आम्हाला कोणतीही पुर्व कल्पना न देता मेट्रो स्टेशनचा आराखडा अंतिम करुन आमच्या समाजावर हेतु परस्पर अन्याय केलेला आहे. प्रशासनाने यामुद्यावरून संघर्ष होऊ नये, याची दक्षता घ्यावी. मेट्रो स्टेशनचा आराखडा बदलुन स्टेशन अहिल्यादेवी होळकर चौकालगत एम्पायर इस्टेट पुलाचे बाजुला स्थलांतरीत करावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये पीएमपीएमएल बस थांबा, ग्रेड सेपरेटर यांना  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक असे नाव देण्यात यावे. मेट्रो स्टेशनलाही अहिल्यादेवी होळकर चौक चौक असे नाव द्यावे. स्टेशनची मिरर इमेज करुन स्टेशन स्थलांतरीत करणे तांत्रिक दृष्ट्या शक्य नसल्यास सद्यस्थितीतील अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा स्टेशन खाली येत आहे. पुतळा मागील जागेत स्थलांतरीत करावा.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड