शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

तळेगाव दाभाडेच्या उपनगराध्यक्षाचा राजीनामा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 18:54 IST

नगर परिषदेच्या डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर जानेवारी २०१७ मध्ये सुनील शेळके यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

ठळक मुद्देयेत्या १५ दिवसात नव्या उपनगराध्याक्षाची निवडीची घोषणा 

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा गुरूवारी (दि. २४ मे) दिला. राजीनामा देण्याचे कोणतेही कारण त्यांनी स्पष्ट केले नसले तरी भारतीय जनता पक्षाच्या आदेशानुसार आपण या पदाचा राजीनामा देत आहोत असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. सदर राजीनामा राजीनामा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी स्वीकारला आहे.    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर परिषदेच्या डिसेंबर २०१६मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा, जनसेवा विकास समिती आणि आरपीआय आठवले गट यांना बहुमत प्राप्त होत सत्ता परिवर्तन झाले होते. त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये सुनील शेळके यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. शेळके यांनी १५ महिने उपनगराध्यक्ष आणि पाणी पुरवठा समितीचे पदसिध्द सभापती म्हणून प्रभावीपणे काम केले. स्टेशन आणि गाव भागातील पाण्याचा गंभीर प्रश्न त्यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला. पाणी प्रकल्पांच्या विविध कामातील निविदेतील प्रस्तावित रकमेत कोट्यावधी रूपयांची बचत करून सुमारे १८ टक्के कमी दराने ही कामे त्यांनी केली. सुमारे सव्वा कोटी रूपयांची एक्स्प्रेस फीडर योजनेमुळे अखंड विद्युत पुरवठा प्राप्त झाल्याने २४ तास पाणी उपसा शक्य झाला. त्यामुळे गेले वर्षभर तळेगावकरांना नियमित व पुरेसा पाणी पुरवठा होत आहे. येत्या १५ दिवसात नव्या उपनगराध्याक्षाची निवडीची घोषणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडून नवीन उपनगराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेची घोषणा आगामी १५ दिवसात होण्याची शक्यता आहे. सुनील शेळके सलग दुस-यांदा नगरसेवक म्हणून नगर परिषदेत कार्यरत आहेत. स्थायी समितीसह इतर कोणत्याही समितीवर शेळके सदस्य नसल्याने आता त्यांच्यावर पक्षातर्फे कोणती जबाबदारी सोपवण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष आहे.     

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसElectionनिवडणूकBJPभाजपा