शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

रिंगरोड प्रकल्पामध्ये मेट्रोसाठी राखीव मागिंका; पण उपनगरीय रेल्वेमार्गाबाबत दुर्लक्ष कायम

By नारायण बडगुजर | Updated: June 17, 2025 14:00 IST

'पीएमआरडीए'कडून केवळ रस्त्यांवर भर : ट्राम, लोकलसारख्या पर्यायांकडे लक्ष कधी देणार?; रिंगरोडला समांतर उपनगरीय लोहमार्ग उभारण्याची मागणी; मुंबईचा आदर्श, पुण्याकडे दुर्लक्ष, नागरिकांना करावा लागणार अडचणींचा सामना 

पिंपरी :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने प्रस्तावित रिंगरोड प्रकल्पात मेट्रोसाठी राखीव मार्गिका ठेवली आहे. मात्र, प्रकल्प खर्चिक असल्याने आणि मेट्रो मुख्यतः दाट वस्तीतील प्रवासासाठी उपयुक्त असल्याने, हा पर्याय व्यवहार्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे या रिंगरोडला समांतर उपनगरीय लोहमार्ग उभारण्याची मागणी होत आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) नवी मुंबई आणि परिसरात लोकल रेल्वे जाळ्याचा वेगाने विस्तार करत असून, विमानतळापर्यंत लोकल ट्रेन पोहोचवली जात आहे. या तुलनेत, पुणे महानगर परिसरातील वाहतुकीसाठी पीएमआरडीएकडून काही ठोस प्रयत्न झालेले दिसत नाहीत. त्यामुळे प्रशासन आणि राज्य सरकार पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत सकारात्मक आहेत की नाही, हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रिगरोड व लोहमार्गासाठी समांतर भूसंपादन प्रक्रिया राबवावी, अशी मागणी होत आहे.मेट्रोपेक्षा कमी खर्चिक प्रकल्प !पीएमआरडीएच्या रिंगरोड प्रकल्पात मेट्रोसाठी एक लेनचा समावेश केला असल्याचे सांगण्यात येत आहे. रिंगरोड अस्तित्वात आल्यानंतर मेट्रो मार्ग उभारण्यासाठी अनेक वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. दाटवस्ती असलेल्या भागात मेट्रो प्रकल्पाला प्राधान्य दिले जाते. तसेच तज्ज्ञांच्या मतानुसार, मेट्रोपेक्षा उपनगरीय रेल्वे अधिक व्यवहार्य आणि कमी खर्चिक पर्याय आहे. त्यासाठी तातडीने स्वतंत्र लोहमार्ग आराखडा तयार करून पीएमआरडीएने रिंगरोडच्या समांतर उपनगरीय सेवा सुरू करावी.उपनगरीय रेल्वेचा पर्याय ठरू शकतो 'गेम चेंजर'१ तळेगाव दाभाडे ते चाकण-रांजणगाव मार्गे उरुळी कांचनदरम्यान लोहमार्ग उभारण्याबाबत रेल्वे प्रशासन विचाराधीन आहे. त्याचप्रमाणे तळेगाव दाभाडे ते जेजुरी-लोणंदपर्यंत रिंगरोडला समांतर लोहमार्ग उभारला गेला तर उपनगरीय लोकल रेल्वेसेवा सुरू होऊ शकते. 

हे दोन लोहमार्ग अस्तित्वात आल्यास पुणे रेल्वे स्टेशनवरील ताण कमी होईल. बाहेरून येणाऱ्या कामगारवर्गाला प्रवासाचा पर्याय मिळेल. बारामती, मावळ, चाकण, रांजणगाव, कुरकुंभ अशा एमआयडीसी परिसरांशी सोयीस्कर कनेक्टिव्हिटी मिळेल.

योजना आणि अंमलबजावणीतील अडथळे :भूसंपादनातील विलंब : शेतकऱ्यांचा विरोध, न्यायालयीन खटलेअपुरा निधी : प्रकल्पांसाठी केंद्र-राज्य स्तरावरून निधी उपलब्ध न होणेप्रशासनिक गोंधळ : विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभावनवीन नियोजनाचा अभाव : लोकल सेवा किंवा मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्टसाठी स्पष्ट धोरण नाही एमएमआरडीएला जमते, पीएमआरडीएला का नाही?एकीकडे नवी मुंबईत एमएमआरडीएने नियोजनबद्ध विकास साधला असताना, पुण्यात पीएमआरडीएकडून सार्वजनिक वाहतूक योजनांबाबतचा गोंधळ अजूनही कायम आहे. प्रशासन आणि राज्य सरकारला आता तरी जाग यावी, अशी सामान्यांची अपेक्षा आहे.

रिंगरोडभोवती अतिक्रमण झाल्यावर जाग येणार का?रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू असतानाच पीएमआरडीएच्या अनेक भागांत अतिक्रमण वाढत आहे. भविष्यात रिंगरोडलगत अतिक्रमण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिंगरोडलगत असलेल्या प्रकल्पांमध्ये जे अडथळे येतील, त्यासाठी प्रशासन आजही गांभीर्याने विचार करत नसल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडlonavalaलोणावळाMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे