शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

आपत्तीनिवारण कक्ष सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 03:03 IST

पवना नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने महापालिकेच्या आपत्ती निवारण विभागाची तातडीची बैेठक झाली.

पिंपरी : पावसाचा जोर वाढल्याने पवना धरणातून साडेचार हजार क्युसेक पाणी सोडले आहे. त्यामुळे पवना नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने महापालिकेच्या आपत्ती निवारण विभागाची तातडीची बैेठक झाली. दक्षता घेण्याची सूचना प्रशासनाने सर्व प्रभाग आणि अधिकाऱ्यांना केल्या आहेत.पिंपरी-चिंचवड आणि मावळ भागात पावसाचा जोर कायम आहे. पवना धरण परिसरातही पाऊस वाढला आहे. पवना धरण १०० टक्के भरले असून, धरणातून दररोज पाण्याचा विसर्ग वाढत आहे. सुमारे साडेचार हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. परिणामी नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह नेहमीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नदीकाठावरील वस्त्यांमधील नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थिती ओढावू नये यासाठी महापालिकेच्या वतीने या संदर्भातील बैठक घेतली. सर्व संबंधित विभागांना यंत्रणा सुसज्ज ठेवणेबाबत सूचना केल्या आहेत.अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले,‘‘आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष तसेच क्षेत्रीय कार्यालयस्तरावर पूरनियंत्रण कक्ष सुरू केला असून, नागरिकांनी या केंद्राशी संपर्क साधावा. स्थापत्य, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, आरोग्य, अग्निशमन अशा सर्वच विभागांना सूचना दिल्या आहेत.’’पवना धरण परिसरात सलग आठ दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. २१) दुपारी तीनपासून धरणाच्या पॉवर हाऊसच्या माध्यमातून १४००, तर धरणाचे सहाही दरवाजे एक फुटाने उघडून ४६०० क्युसेक, असा एकूण ६००० क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. परिसरातील शिवली, कोथुर्णे हे दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने नदीपलीकडच्या गावांचा संपर्क तुटला आहे. यामध्ये शिवली, येलघोल, धनगव्हाण, येवलेवाडी, भडवली, काटेवाडी, मळवंडी ठुले, कोथुर्णे या गावांचा येळसे व पवनानगरमार्गे होणारा संपर्क दुपारी तीननंतर तुटला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्री पावसाचा जोर वाढल्यास पवना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे.- ए. एम. गदवाल,शाखा अभियंता, पवना धरणमध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष ०२०-६७३३१५५६ व ३९३३१४५६,मुख्य अग्निशमन केंद्र १०१, ०२० - २७४२३३३३, २७४२२४०५, ९९२२५०१४७५अ क्षेत्रीय कार्यालय २७६५६६२१, २७६४१६२७, ९९२२५०१४५३, ९९२२५०१४५४ब क्षेत्रीय कार्यालय २७५०१५३, ९९२२५०१४५५, ९९२२५०१४५६क क्षेत्रीय कार्यालय २७१२२९६९, ९९२२५०१४५७, ९९२२५०१४५८.ड क्षेत्रीय कार्यालय २७२७७८९८, ९९२२५०१४५९, ९९२२५०१४६०.ई क्षेत्रीय कार्यालय २७२३०४१०, २७२३०४१२, ८६०५७२२७७७फ क्षेत्रीय कार्यालय २७६५०३२४, ८६०५४२२८८८ग क्षेत्रीय कार्यालय ७७८७८६८५५५, ७८८७८७९५५५ह क्षेत्रीय कार्यालय २७१४२५०३, ९१३००५१६६६, ९१३००५०६६६

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNational Disaster Response Forceराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल