रिक्षाचालकासह दोघांवर वार

By Admin | Updated: May 11, 2015 06:12 IST2015-05-11T06:12:49+5:302015-05-11T06:12:49+5:30

घराजवळ उभ्या केलेल्या रिक्षामधील पेट्रोल कोणी काढले, याची विचारणा केल्यामुळे रिक्षाचालकासह दोघांवर तलवार आणि कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले.

Repeat with both the rickshaw puller | रिक्षाचालकासह दोघांवर वार

रिक्षाचालकासह दोघांवर वार

पिंपरी : घराजवळ उभ्या केलेल्या रिक्षामधील पेट्रोल कोणी काढले, याची विचारणा केल्यामुळे रिक्षाचालकासह दोघांवर तलवार आणि कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास येथील मिलिंदनगरमध्ये घडली.
विनय पवार (वय ३२), संदीप तरकड (वय २८, दोघे रा. मिलिंदनगर, पिंपरी) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संदीप तरकड हा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतो. दिवसभर व्यवसाय करून आल्यानंतर तो रिक्षा घरासमोर लावतो.
काही दिवसांपासून त्याच्या रिक्षामधील पेट्रोलची चोरी होत होती. शनिवारी रात्री पेट्रोल चोरी करणाऱ्यांना तो शिवीगाळ
करीत होता. त्या वेळी महंमद शेख हा तेथून जात होता. त्याने तरकडकडे याची चौकशी केली. त्यावेळी तरकड याच्यावर तलवार आणि कोयत्याने वार केले. (प्रतिनिधी)

Web Title: Repeat with both the rickshaw puller