रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचे होणार नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2016 03:26 IST2016-02-10T03:26:38+5:302016-02-10T03:26:38+5:30

येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी वास्तुविशारद नेमण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.

Renovation of Ramkrishna More will be done in theater | रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचे होणार नूतनीकरण

रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचे होणार नूतनीकरण

चिंचवड : येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी वास्तुविशारद नेमण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.
या नाट्यगृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, काही प्रमाणात येथील वस्तूंच्या दुरवस्थेसह इमारतीचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथे दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यामध्ये खराब खुर्च्या बदलणे, स्थापत्यविषयक कामे करणे, स्टेज नूतनीकरण, म्यूरल, स्वच्छतागृह, दर्शनी भाग नूतनीकरण, साइन बोर्ड अद्ययावत करणे, समोरील भागाचे सुशोभीकरण, पायऱ्यांवर रेलिंग, नाट्यगृहाबाहेरील भागाचे आधुनिक पद्धतीने नूतनीकरण, नाट्यगृहातील कार्यालय अद्ययावत करणे आदी कामे केली जाणार आहेत. या कामासाठी वास्तुविशारदाची नेमणूक केली जाणार आहे.
या प्रकल्पासाठी अंदाजपत्रकीय रक्कम एक कोटी इतकी आहे. मात्र, प्रत्यक्ष नियोजनानंतर खर्च निश्चित केला जाणार आहे. या कामासाठी वास्तुविशारद नेमण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर वास्तुविशारदाला निविदापूर्व कामासाठी एक टक्का व निविदेनंतरच्या कामासाठी १.३५ टक्के रक्कम देय राहणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Renovation of Ramkrishna More will be done in theater