शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तीन दिवसांत पाण्याचा प्रश्न निकाली काढा ; अन्यथा गाठ माझ्याशी - महेश लांडगे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 17:47 IST

पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे येत्या तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळित करण्याबाबत उपाययोजना करण्यात याव्यात, अशा कडक सूचना आमदार लांडगे यांनी अधिका-यांना दिल्या.

ठळक मुद्दे पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत उपाययोजना करण्याचे अधिका-यांना निर्देशज्या सोसायट्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचा रोष

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच भागातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. यामुळे नागरिक वैतागले असून त्रस्त झाले आहेत. येत्या तीन दिवसात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा माझ्याशी गाठ असल्याचा निर्वाणीचा इशारा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अधिका-यांना दिला. तसेच नागरिकांना दोषी धरत अधिका-यांनी बिल्डर, ठेकेदारांना पाठीशी घालू नये, अशी तंबीही त्यांनी दिली. आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचा कामाला वेग देण्यात यावा, असेही ते म्हणाले. भोसरीसह शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत आमदार लांडगे यांनी सोमवारी घेतला. पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी अधिका-यांना दिले आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे, मकरंद निकम, नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकुर बैठकीला उपस्थित होते.  लांडगे  म्हणाले, भोसरी परिसरात सगळीकडे पाणी पुरवठा विस्कळीत आहे. बो-हाडेवाडीत पाण्याची टाकी एकच असून पाण्याची मागणी जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी अनियमित व कमी दाबाने मिळत आहे. डुडूळगावात देखील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. दिघीतील माउलीनगर, दिघीतील मोठ्या सोसायट्या, जय गणेश साम्राज्य, लांडगेनगर, नेहरुनगर, मोशी गायकवाड वस्ती, मोशी, देहूरोड या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे'. 'शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळाले पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित आहे. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे येत्या तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळित करण्याबाबत उपाययोजना करण्यात याव्यात, अशा कडक सूचना त्यांनी दिल्या. शहरातील अनेक गृहप्रकल्पांना चुकीच्या पद्धतीने ना-हारकत दाखला दिला जातो. त्यांच्याकडून नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची हमी घेतली जात नाही. सोसायट्यांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांने पार पाडणे गरजेचे आहे. ज्या सोसायट्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई करावी, असा सूचनाही महेश लांडगे यांनी दिल्या आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, बांधकाम व्यावसायिकांनी सोसायटीतील नागरिकांना पाण्याची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. व्यावसायिकांकडून सोसायटीला पाण्याची व्यवस्था कशी केला जाणार आहे, याचा आराखडा घेण्यात यावा. त्यानंतरच बांधकाम पूर्णत्वाचे ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच ज्या व्यावसायिकाने पूर्वी बांधकाम केलेल्या सोसायट्यांमध्ये पाण्याची व्यवस्था केली नाही. त्यांना पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात यावेत. त्यासाठी सात दिवसांची मुदत द्यावी. मुदतीत व्यवस्था न केल्यास त्यांचा बांधकाम परवाना रद्द करण्यात यावा.'' अशा सूचना आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना दिल्या आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाWaterपाणी