पोलीस असतानाच पाळले जातात नियम
By Admin | Updated: July 22, 2015 02:59 IST2015-07-22T02:59:05+5:302015-07-22T02:59:05+5:30
शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढत आहे. त्या प्रमाणात रस्ते दिवसेंदिवस कमी पडत आहेत. सध्या शहरात ट्रॅफिक पोलीस

पोलीस असतानाच पाळले जातात नियम
पुणे: शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढत आहे. त्या प्रमाणात रस्ते दिवसेंदिवस कमी पडत आहेत. सध्या शहरात ट्रॅफिक पोलीस असतानाच वाहतुकीचे नियम पाळले जातात. ते नसताना सर्रासपणे वाहतुकीचे नियम पुण्यातील वाहनचालक मोडताना दिसत आहेत. त्यामुळे आहे त्या रस्त्यांवर वाहतुकीचे व्यवस्थित नियोजन केले, तर वाहतूककोंडीच्या प्रश्नावर काही प्रमाणात का होईना; पण तोडगा काढता येईल.
नागरिकांची आणि पोलिसांची सोबत असणे गरजेचे. मात्र हेच नेमके घडत नसल्यामुळे वाहतूककोंडी नियमित होत आहे. बेशिस्त वाहतुकीमुळेच वाहतूककोंडी होते, हे लोकमत टिमने शहरातील विविध चौक आणि सिग्नलवर पाहणी केली असता त्यामध्ये पोलीस आणि काही नागरिक याला जबाबदार असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी पोलीस असताना सिग्नलची शिस्त फक्त दंडापोटी पाळली जाते. तर अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस वेळेवर हजर नसणे, वाहतुकीचे नियोजन सोडून फक्त पावती फाडण्याचेच काम करताना दिसून येतात.
सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करणे, सिग्नल तोडणे, कर्कश हॉर्न वाजवणे, जोरात वाहन चालवून आवाज करत जाणे असे अनेक प्रकार घडत असतात. सिग्नल तोडणाऱ्यावर फक्त कारवाई केली जाते. त्याव्यतिरिक्त कोणत्याही वाहनचालकावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे यांना
अधिकच जोर चढतो. शहरात वाहतूक पोलीस प्रत्येक ठिकाणीच पुरे पडणार नाहीत. त्यासाठी स्वयम शिस्त पाळणेही महत्त्वाचे आहे.