रेड झोनचा मुद्दा ठरणार कळीचा

By Admin | Updated: October 13, 2016 02:00 IST2016-10-13T02:00:40+5:302016-10-13T02:00:40+5:30

स्थानिक व एमआयडीसी परिसरामुळे बाहेरून येऊन स्थायिक झालेला कामगार वर्ग असा हा स्थानिक आणि बाहेरचा असा संमिश्र मतदारांचा प्रभाग

The red zone issue will be the key | रेड झोनचा मुद्दा ठरणार कळीचा

रेड झोनचा मुद्दा ठरणार कळीचा

पिंपरी : स्थानिक व एमआयडीसी परिसरामुळे बाहेरून येऊन स्थायिक झालेला कामगार वर्ग असा हा स्थानिक आणि बाहेरचा असा संमिश्र मतदारांचा प्रभाग आहे. शहराच्या तुलनेत या भागातील विकास संथ गतीने झाला आहे. रेड झोन हद्दीतील बांधकामांचा प्रश्न जटिल बनला आहे.
रेड झोन हद्दीत असलेल्या बांधकामांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. तसेच रेड झोन हद्दीचा निर्णय होत नसल्याने बांधकामे करता येत नाहीत. त्यामुळे निवडणुकीसाठी रेड झोन हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.
तळवडे प्रभाग क्रमांक १मधील पूर्वीचा तळवडे गावठाणाचा भाग चिखली प्रभागाला जोडला आहे. तसेच स्पाइन रस्ता तळवडे हद्दीतील राम मंदिर ते निगडीला जोडणारा परिसर या प्रभागातून वगळला आहे. त्यामुळे त्रिवेणीनगर गावठाणातील २ आणि स्पाइन रस्ता येथील एक हजार अशी तीन हजार मतदार संख्या दुसऱ्या प्रभागाला जोडली गेली आहे. गावठाणातील मते कमी झाल्याने स्थानिक उमेदवाराला या तीन हजार मतांची तोंडमिळवणी करणे कठीण जाणार आहे.
नगरसेवक शांताराम कोंडिबा भालेकर आणि नगरसेविका पौर्णिमा रवींद्र सोनवणे हे प्रभागाचे प्रतिनिधित्व करत आहेत. दोघेही राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. शांताराम
भालेकर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या संपर्कात आहेत.
चिखली प्रभागातून स्वाती साने आणि दत्तात्रय साने हे निवडून आले. नव्या प्रभागरचनेत हा भाग जोडला गेल्यामुळे आरक्षण सोडतीत विद्यमान नगरसेवकांना पुन्हा निवडणुक लढविण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The red zone issue will be the key

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.