शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर निवडणुकीत होणार बंडखोरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 13:52 IST

महापौर निवडीत होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात असून राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्यांना फोडण्यासाठी व्यूहरचना सुरू झाली आहे..

ठळक मुद्देमहापौर निवडीत पक्षाच्या निष्ठावान नगरसेवकांना संधी देणार की नवीन सदस्यांना संधी देणार?

पिंपरी : राज्यात महाशिवआघाडीचे सरकार येण्यासाठी सुरुवात झाली असून, सत्तांतराचे परिणाम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर निवडीत होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात असून राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्यांना फोडण्यासाठी व्यूहरचना सुरू झाली आहे. नगरसेवक फुटू नयेत, यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत.राज्यात २०१४ मध्ये भाजपाचे सरकार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले होते. त्यामुळे मागील २०१७ पूर्वी ३ संख्या असणाऱ्या महापालिकेत ७७ नगरसेवक भाजपाचे निवडून आले आहेत. तर ८२ नगरसेवकांवरून राष्ट्रवादी ३६ नगरसेवकांवर आली होती. फडणवीसांनी अजित पवार यांचे शिष्य आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांना ताकद दिली. त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा मोठा गट भाजपात सामील झाला आणि भाजपाची सत्ता आली.विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपा सरकार स्थापन्यास असमर्थ असल्याने महाशिवआघाडीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. बदलाचे परिणाम महापालिकेच्या राजकारणावर होणार असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस व राष्टÑवादीतून भाजपात गेलेल्या ५० नगरसेवकांची चलबिचल सुरू झाली आहे.महापालिकेतील १२८ नगरसेवकांपैकी भाजपाचे ७७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६, शिवसेनेचे नऊ, अपक्ष पाच, मनसे एक पक्षीय बलाबल आहे. राज्यात सत्तांतर झाल्यास अजित पवार महापालिकेच्या राजकारणात लक्ष घालणार आहेत. त्यामुळे २१ ला होणाऱ्या महापौर निवडीत भाजपाचे सदस्य फोडाफोडी करण्याची व्यूहरचना केली जात आहे. महापालिकेत महापौरपदाची निवडणूक झाल्यास ६५ मतांची आवश्यता आहे. भाजपाकडे बारा नगरसेवक अधिक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे अपक्ष एकत्र आल्यास हे संख्याबळ ५० सदस्यांचे आहे. त्यामुळे केवळ १५ नगरसेवक फोडण्याची आवश्यकता आहे. किंवा नगरसेवक अनुपस्थित राहिले तरी भाजपाचा महापौर होण्यास धोका होऊ शकतो............

नवीन जुन्यांपैकी कोणास संधीमहापौर निवडीत पक्षाच्या निष्ठावान नगरसेवकांना संधी देणार की नवीन सदस्यांना संधी देणार? आमदार, खासदार समर्थकांना संधी देणार? कोण होणार महापौर याबाबतची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. महापौर निवडीत निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी होत आहे. यासाठी काहींनी पक्षाच्या श्रेष्ठींचीही भेट घेतली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMayorमहापौरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस