शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Chinchwad By-Election | शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांची बंडखोरी, उमेदवारी अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 14:42 IST

वाकडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेवून रॅलीला सुरुवात ...

पिंपरी :  महाविकास आघाडीतून उमेदवारी डावलल्यानंतर शिवसेनेचे माजी गटनेते आणि नगरसेवक राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वाकडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेवून रॅलीला सुरुवात झाली. चिंचवड येथील महासाधू मोरया गोसावी महाराज आणि थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.

थेरगाव येथील ग प्रभाग कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप, माजी नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेविका मीनल यादव, अश्विनी वाघमारे आदी उपस्थित होते.

काटेंच्या उमेदवारीनंतर कलाटेंची बंडखोरी-

महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि शिवसेनेचे राहुल कलाटे ही  दोन नाव सुरुवातीपासून चर्चेत होती. राहुल कलाटे यांचे नाव आघाडीवर होते. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली.

वाकड येथून रॅली काढली. वाकडचे ग्रामदैवत म्हातोबामहाराज यांचे दर्शन घेऊन चिंचवड गाव येथील महासाधू मोरया गोसावी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन, थेरगाव येथील डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर थेरगाव येथील चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन दुपारी दोनला कलाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारchinchwad-acचिंचवड