शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक! पिंपरी चिंचवड शहरातील ४० जणांचे अहवाल निगेटिव्ह; एकही नवीन रुग्ण नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 19:38 IST

बाधितांची एकुण संख्या २७, एक जण गंभीर

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असून शुक्रवारी तीन रूग्ण आले आढळून

पिंपरी :  पिंपरी चिंचवड शहरातील ४० जणांचे घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्ही मध्ये तपासणीसाठी पाठीवण्यात आले होते त्यापैकी ४० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकाही पॉझिटिव्ह रुग्णात वाढ झालेली नाही. आज नवीन ५० जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवले आहेत. तर दाखल रुग्णापैकी एकाची तब्येत गंभीर आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असून शुक्रवारी तीन रूग्ण आढळून आले आहेत. ४८ तासात शहरात पाच रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकुण रूग्णांची संख्या २७ वर गेली आहे. मरकज येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती असून त्यात एक महिला, पुरूष आणि त्यांची छोटी मुलगीचा समावेश होता. 

पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेशुक्रवारी ५३ जणांचे घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल शनिवारी सकाळी मिळाले आहेत. त्यात ४० जण निगेटिव्ह आले आहेत. ........४२ अहवाल प्रतीक्षेतशनिवारी शहरातील रुग्णालयात ४२ जणांना दाखल केले असून त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीला पाठविले आहेत. त्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत............संशयितांची संख्या वाढतेय शहरातील एकुण रूग्णांची संख्या २७ झाली आहे. तर एकुण दाखल रूग्णांपैकी १२ रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तसेच आज ४० जणांना घरी सोडण्यात आले आहे.  कोरोनामुळे एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. मात्र संशयितांची संख्या वाढत आहे......................................एक जण गंभीरपिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा वाढण्यास दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिक जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर या नागरिकांच्या सहवासात आलेल्यांचाही महापालिका प्रशासन शोध घेत आहे. गेल्या आठवडा भरात दाखल झालेल्या एकुण पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये मरकज कार्यक्रमातील सहभागी झालेल्या नागरिकांचा समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून मरकज कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांच्या सहवासात आलेल्या नागरिक  पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. महापालिका रुग्णालयात 14 जण उपचार घेत आणि एक जण पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये अजून एकही कोरोनाने मृत्यू झाला नाही ही दिलासादायक बातमी असली तरी १४ पैकी एक जणाची तब्येत गंभीर आहे. तर १३ जणांची तब्येत स्थिर आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस