शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कारण-राजकारण : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इच्छुकांमध्ये धाकधूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 13:24 IST

निवडणूक प्रक्रियेस गती आल्याने माजी नगरसेवक व इच्छुकांमध्ये उत्साह संचारला आहे. ते 'अॅक्शन मोड'मध्ये आले आहेत.

पिंपरी : महापालिका निवडणुकीस सव्वातीन वर्षांनंतर गती मिळाली आहे. त्यामुळे महायुती, महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या इच्छुकांमध्ये धाकधूक सुरू झाली आहे. उमेदवारीसाठी हालचाली सुरू झाल्या असून, पिंपरी-चिंचवड शहरात स्वतंत्रपणे लढण्याची गळ स्थानिक नेत्यांना घातली जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका १२ मार्च २०२२ पासून बरखास्त झाली. कोरोना महामारी व इतर कारणांमुळे महापालिका निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या जात होता. तब्बल सव्वातीन वर्षांनंतर निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना प्रभागरचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने चार सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे निवडणूक कामकाजाला गती मिळाली आहे.

आता माजी नगरसेवक व इच्छुकांमध्ये उत्साह संचारला आहे. ते ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी झाल्यास या निवडणुकीत आपला पत्ता कट होईल, या भीतीने अनेक जण धास्तावलेही आहेत. महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या प्रमुख पक्षांतील इच्छुक युती किंवा आघाडी होऊ नये या मताचे आहेत. कारण, तसे झाल्यास अनेकांच्या उमेदवारीवर गदा येण्याची शक्यता आहे.

स्वबळावर लढणे योग्य असल्याचे दाखले

स्वतंत्रपणे लढण्यासाठी स्थानिक तसेच, मुंबईतील नेत्यांना गळ घातली जात आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शहरात पक्ष वाढीसाठी स्वबळावर लढणे योग्य असल्याचे दाखले दिले जात आहेत. त्यात त्यांना किती यश मिळते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेElectionनिवडणूक 2024