शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांवर पट्टी बांधून प्रांजल करते वाचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 03:08 IST

डोळ्यावर पट्टी बांधून पुस्तक वाचन, पेंटिंग, स्केटिंग व हावभाव ओळखण्याचे कौशल्य सरस्वती साधनेच्या माध्यमातून शक्य असल्याचे प्रांजल पंकज बरडिया (वय ८) हिने दाखवून दिले आहे.

चिंचवड : डोळ्यावर पट्टी बांधून पुस्तक वाचन, पेंटिंग, स्केटिंग व हावभाव ओळखण्याचे कौशल्य सरस्वती साधनेच्या माध्यमातून शक्य असल्याचे प्रांजल पंकज बरडिया (वय ८) हिने दाखवून दिले आहे. आकुर्डीत चातुर्मास काळात जैन साध्वी नवकार आराधिका प्रतिभाजी म.सा. यांच्या प्रेरणेतून आयंबिल आराधिका प्रफुल्लाजी म. सा. यांनी १२० विद्यार्थ्यांना सरस्वती साधनेतून मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन केले. या साधनेतून डोळ्यावर पट्टी बांधून सर्व काही करता येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.डोळ्यात काळाकुट्ट अंधार दाटलेला असतानाही मुलांना सहजपणे रंग ओळख, वाचन, पेंटिंग व स्केटिंगसारखे प्रकार सहज करता येत आहेत. प्रांजल हिने चार महिने सतत साधना करीत स्वत:ला सिद्ध केले आहे. स्पर्शज्ञान, आवाज व सुगंधाच्या माध्यमातून आपल्याला या सर्व गोष्टी करता येत असल्याचे तिने सांगितले.प्रांजल पाचवीत शिकत आहे. सुरुवातीला सरस्वती साधनेतून हे करता येईल यावर विद्यार्थ्यांना विश्वास बसत नव्हता. मात्र प्रफुल्लाजी म. सा. यांनी ध्यान व साधनेच्या माध्यमातून हे शक्य असल्याचे दाखवून दिले आहे. मुलांच्या बौद्धिक विकासात या साधनेमुळे मोठा बदल झाल्याचे प्रांजलची आई योगिता यांनी सांगितले. मुलीच्या स्मरणशक्तीत फरक पडला असून, अभ्यासात एकाग्रता आल्याचे त्यांनी सांगितले. या साधनेमुळे मुलांच्या वागण्यात व बोलण्यातही बदल झाल्याचे पालक सांगत आहेत.शिबिरात गौरव बाफना, तिलोक दुगड, सुजल ओसवाल, कुशल कांकरिया, संयमी बलदोटा, विधी बडेरा, सिद्धी बोरा, अस्मि सेठिया या मुलांनीही सरस्वती साधनेच्या माध्यमातून मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन केले आहे. या पुढील काळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्मिता संतोष मुथा व योगिता पंकज बरडिया यांना जैन साध्वींनी प्रशिक्षण दिले आहे. गांधी पेठेतील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या स्थानकात विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर सुरू करण्यात आले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणMeditationसाधना