रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधवची आकुर्डीत निर्घृण हत्या; महाकाली टोळीचा हात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 12:12 IST2017-11-21T12:08:41+5:302017-11-21T12:12:27+5:30

निगडी परिसरात अनिकेत जाधव या तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली. अनिकेत जाधव हा रावण सेना या गुन्हेगारी टोळीचा प्रमुख होता. या घटनेनंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. 

Ravan gang leader Aniket Jadhav's remorselessly murder in Akurdi; Mahakali gang hand? | रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधवची आकुर्डीत निर्घृण हत्या; महाकाली टोळीचा हात?

रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधवची आकुर्डीत निर्घृण हत्या; महाकाली टोळीचा हात?

ठळक मुद्देसोमवारी (दि. २० नोव्हेंबर) मध्यरात्री आकुर्डी येथील शीतलादेवी मंदिराजवळ घडला प्रकारहल्ल्यामागे महाकाली टोळीचा हात असावा, असा पोलिसांना संशय

पिंपरी : निगडी परिसरात मध्यरात्री अनिकेत जाधव या तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली. अनिकेत जाधव हा रावण सेना या गुन्हेगारी टोळीचा प्रमुख होता. रावेत, आकुर्डी या परिसरात टोळीची दहशत होती. सोमवारी (दि. २० नोव्हेंबर) मध्यरात्री आकुर्डी येथील शीतलादेवी मंदिराजवळ हा प्रकार घडला. 
काही अज्ञात आरोपींनी अनिकेत जाधव याच्या डोक्यात दगड घातले, कोयत्याचे वार घरून त्याला ठार मारले. या घटनेनंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री चार ते पाच जणांच्या टोळक्याने अनिकेतला ठार मारले,  पूर्ववैमस्यातून आणि वर्चस्ववादातून हा प्रकार घडला असल्याचे पोलीस निरीक्षक विजय पळसुले यांनी दिली. अनिकेतवर अनेक गुन्हे दाखल आहेत.
महिनाभारापूर्वी त्याने आकुर्डीच्या रमाबाई वसाहतीमध्ये महाकाली टोळीचा प्रमुख हनम्या शिंदे याच्यावर गोळीबार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर अनिकेत जाधव फरार होता. मात्र, काल रात्री त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्यामुळे या हल्ल्यामागे महाकाली टोळीचा हात असावा, असा पोलिसांना संशय आहे. निगडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: Ravan gang leader Aniket Jadhav's remorselessly murder in Akurdi; Mahakali gang hand?