शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार बलात्कार; भोसरीत तरुणावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 20:01 IST

लग्नास नकार दिल्याने तरुणीने विषारी औषध पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी : प्रेमसंबंध निर्माण करून, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर एका तरुणाने वारंवार तिच्या मर्जीविरोधात जाऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नास नकार दिला. यामुळे तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तरुणाने त्या दोघांमधील फोटो, मेसेज, रेकॉर्डिंग डिलीट केले. तरुणीने लिहिलेली डायरी लपवली. याप्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.अविनाश अनंत भांगे (वय २७, रा. नखातेवस्ती, काळेवाडी, पिंपरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने गुरुवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार जून २०१९ ते १३ जुलै २०२१ या कालावधीत मळवली स्टेशन लोणावळा येथे एका लॉजवर, पीडित तरुणीच्या घरी आणि हिंजवडी येथील एका लॉजिंगवर घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरुणीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तरुणीला शिवीगाळ, दमदाटी करून हाताने मारहाण केली. एवढे करून त्याला लग्नाबाबत विचारले असता त्याने तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला.

यामुळे तरुणीने विषारी औषध प्राशन केले. ती हॉस्पिटलमध्ये असताना अविनाश याने तिने लिहून ठेवलेली डायरी, मोबाईलमधील सर्व फोटो, मेसेज, रेकॉर्डिंग डिलीट केले. अजित अनंत भांगे या व्यक्तीच्या फोनवरून पीडित तरुणीला फोन करून त्यातील अविनाशला मेसेज का केलेस. तू त्याचे दोन वर्षे आयुष्य बरबाद केले आहे. तू त्याच्याशी लग्न करून त्याला बरबाद करणार आहेस का, असे म्हणत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :bhosariभोसरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक