शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे; शिक्षण विभागाची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 02:41 IST

माध्यमिक विभागातील शाळेत सीसीटीव्हीचा नाही पत्ता

पिंपरी : शाळेमध्ये मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. अनेकदा शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपाची मारहाण केली जाते. या सर्व गोष्टींवर वचक ठेवण्यासाठी शाळांमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्याची आवश्यकता आहे. मात्र, शहरातील महापालिकेच्या माध्यमिक विभागातील शाळा अजूनही ‘सीसीटीव्ही’च्या प्रतीक्षेत आहेत. महापालिकेच्या प्राथमिक विभागातील शाळांमध्ये मागील वर्षी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची काही ठिकाणी दुरवस्था झाली आहे. यामुळे, शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. मात्र, शहरात गेल्या काही दिवसांत खासगी व महापालिका शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार सुरू आहेत. तसेच शिक्षकांनी विद्यार्थिनीला केलेल्या गंभीर मारहाणीची घटना ताजी आहे. या विकृत घटना वाढत असून, त्या रोखण्यासाठी शाळांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे. त्यामुळे अशा विकृती करणाºयांवर वचक बसेल. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे होते. प्राथमिक विभागात ८७ शाळा असून, त्यासाठी ३५० हून अधिक कॅमेरे मागील वर्षी बसविण्यात आले होते. मात्र, काही शाळांमधील कॅमेरे नादुरुस्त असल्याने ते केवळ ‘शो पिस’ म्हणूनच शिल्लक आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागील वर्षी बसवलेले कॅमेरे किमान चार वर्ष सुस्थितीत राहणे अपेक्षित होते. मात्र एकाच वर्षात कॅमेरे खराब झाल्याने तिसरा डोळा खरेदी करणाºयांवर कुणाचीच नजर नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.विद्यार्थी उद्याचे भविष्य आहेत हे लक्षात घेऊन महापालिकेच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी भरघोस योजना जाहीर केल्या जातात. मात्र, याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. महापालिकेच्या विद्यार्थ्यांची वाढती पटसंख्या पाहता व सतत होत असलेल्या विकृत घटना रोखण्यासाठी शहरातील शाळांमध्ये किमान चार ते पाच कॅमेरे आवश्यक आहेत. मात्र, काही शाळांमध्ये कॅमेरे केवळ मुख्य प्रवेशद्वारावरच बसविण्यात आले आहेत.शाळेत आपले मूल सुरक्षित आहे या विश्वासावर पालक पाल्याला शाळेमध्ये पाठवतात. मात्र शाळेतही मुलांसोबत अनेक विकृत घटना घडतात. मात्र शाळेतही मुलांना हवी ती सुरक्षा मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कॅमेºयांची नजर हवी आहे. सीसीटीव्ही कॅमेºयांचे फुटेज मध्यवर्ती कार्यालयात उपलब्ध असणे आवश्यक आहे.शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. मात्र, शहरात गेल्या काही दिवसांत खासगी व महापालिका शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार सुरू आहेत. तसेच शिक्षकांनी विद्यार्थिनीला केलेल्या गंभीर मारहाणीची घटना ताजी आहे. या विकृत घटना वाढत असून, त्या रोखण्यासाठी शाळांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे.माध्यमिक विभागाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी विद्युत विभागाशी चर्चा करण्यात आलेली आहे. तसेच, यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पात तरतूद नसल्याने कॅमेरे बसविण्यात आले नाहीत.- पराग मुंढे, सहायक प्रशासन अधिकारी, पिं-चिं. महापालिकाप्राथमिक शाळेतील खराब झालेल्या सीसीटीव्ही बाबत चौकशी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवणे आवश्यक आहे. त्यानुसार तरतूद करून लवकरच कॅमेरे बसविण्यात येतील.’’- प्रा. सोनाली गव्हाणे, सभापती,शिक्षण समिती

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी