शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शक्ती जगाला घाबरविण्यासाठी नव्हे, जगद्कल्याणासाठी हवी- राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 18:37 IST

पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पुणे यांच्या १३ व्या पदवीदान समारंभात राजनाथ सिंह बोलत होते...

पिंपरी : जीवनात ज्ञानास जेवढे महत्व आहे, तेवढेच संस्कारांना आहे. जीवनमुल्यांशी आपण नेहमी कटीबद्ध असायला हवे. आपली जीवनमुल्ये व्यक्तीमत्व घडवित असतात. शिक्षण, अध्यात्म, संस्कारच देशाला पुढे नेतील. भारताला जगदगुरूंचे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. ज्ञान, धन संपत्तीबरोबरच व्यक्तीमत्व विकासाकडे लक्ष घ्यायला हवे. त्यातूनच शक्तीवान, ज्ञानवान, धनवान बनू शकणार आहोत, आपली शक्ती  जगाला घाबरविण्यासाठी नव्हे, जगद्कल्याण भावनेने प्रेरीत असायला हवी, असे मत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पिंपरी येथे शुक्रवारी व्यक्त केले.

तरूणांची जाणीव समृद्धज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यांचे जीवन घडविण्यासाठी असणारे महत्व, मनसंस्कार, मनस्वास्थ यावर मार्गदर्शन करताना महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे दाखले देऊन तरूणांची जाणीव समृद्ध केली. ज्ञान आणि तत्वज्ञानाचे दाखले आणि किस्से सांगितले. त्यास टाळ्यांचा कडकडाट देऊन तरूणाईने दाद दिली.

राजकारणात असतानाही संतुलन ठेवले पाहिजेजीवनात शिक्षण, ज्ञान, संस्कार महत्वाचे आहे. शिक्षणाचा परिणाम व्यक्तिमत्त्व घडण्यास होत असतो. ओसामा बिन लादेन अरबपती, खरबपती होता. मात्र, त्याने ज्ञानाचा दुरुपयोग केला. दुसरीकडे पेपर विक्रेता असणारे ए.पी.जे अब्दुल कलाम हे शास्त्रज्ञ झाले, पुढे देशाचे राष्ट्रपती झाले. देशाला विकास पथावर नेण्यास योगदान दिले. दोन व्यक्तींचा विचार केल्यास शिक्षण आणि संस्कार याचा हा परिणाम आहे, राजकारणात असतानाही संतुलन ठेवले पाहिजे. ते अध्यात्माने येते, असेही राजनाथ सिंह म्हणाले.स्वदेशी २ ची हाकराजनाथसिंह म्हणाले, ‘‘ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला आहे. आपल्या गरजांसाठी दुसऱ्या देशांवर भारत आता अवलंबून राहू इच्छित नाही. त्यासाठी 'व्होकल फॉर लोकल'ची हाक पंतप्रधानांनी दिली आहे. स्वदेशी-२ हा त्याच योजनेचा भाग आहे. स्वदेशीची पहिली हाक याच पुण्यातून लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांनी दिली होती. विद्यार्थ्यांनी व्यवसाय-उद्योगात नव्या संकल्पना आणण्यावर भर द्यावा.’’

पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पुणे यांच्या १३ व्या पदवीदान समारंभात संरक्षण मंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर यावेळी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती  डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री  पाटील, कुलगुरू  डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव  विश्वस्त व कोषाध्यक्ष  डॉ. यशराज पाटील उपस्थित होते.

यावेळी प्रसिद्ध उद्योगपती व फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया, उद्योजक प्रतापराव पवार यांना डी.लिट आणि दत्ता मेघे इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूरचे  प्र-कुलपती  डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना डॉक्टर आॅफ सायन्स (डी.एससी) ही मानद पदवी देऊन गौरविले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRajnath Singhराजनाथ सिंह