शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुनावळेतील कचरा डेपोस विरोध; नागरिकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

By विश्वास मोरे | Updated: October 29, 2023 15:54 IST

पुनावळे काटे वस्ती जंगलातील २२ हेक्टर परिसरात पसरलेली लाखो झाडे कचरा डेपोसाठी तेडली जातील आणि पाणी, माती आणि हवेच्या प्रदुषणामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होईल

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने पुनावळे येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीचा निर्णय घेतला आहे. त्यास विरोध करण्यासाठी नागरीक आक्रमक झाले आहेत. त्यांनी मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. पिंपरी चिंचवड महापालिकेने पुनावळे येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणी संदर्भात निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुनावळे येथील रहिवासी चिंतेत आहोत. निर्णयाबद्दल विरोध करण्यासाठी सर्व नागरीकांनी ठाकरे यांची भेट घेतली. 

महापालिका घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत सुरु करण्यास उत्सुक आहेत. पुनावळे काटे वस्ती जंगलातील २२ हेक्टर परिसरात पसरलेली लाखो झाडे कचरा डेपोसाठी तेडली जातील आणि पाणी, माती आणि हवेच्या प्रदुषणामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होईल. पुनावळे,  हिंजवडी, मारुंजीमधील ग्रामस्थ आणि मनसे सरचिटणीस रणजित शिरोळे, गणेश सातपुते, शहर प्रमुख सचिन चिखले, उपशहरअध्यक्ष राजु सावळे, उपविभाग अध्यक्ष विशाल साळुखे, मारुजी शहरअध्यक्ष सतोष कवडे या उपस्थित होते.  

का आहे विरोध 

१) घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जेव्हा २००८ मध्ये मंजूर केला गेला.  त्यावेळी एवढ्या प्रमाणात नागरीकरण नव्हते.  परंतु आता मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प, शैक्षणिक संस्था, रुग्णालये येथे उभारले गेले आहेत. प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे या सगळ्या गोष्टीवर गंभीर परिणाम होऊ शकतो .२) पुनावळे परीसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेले असून ते अजूनही सुरूच आहे. सुमारे १ लाखाहून अधिक नागरिक सध्या पुनावळे येथे राहत आहेत. नैसर्गिक वातावरण, शेजारी असलेले हिंजवडी आयटी पार्क आहे. मात्र, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.  घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा काही गृह प्रकल्पापासून केवळ दोनशे तीनशे मीटर अंतरावर आहे .३) नैसर्गिकरित्या लाभलेल सौंदर्य नष्ट होईल कारण प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा जंगलाच्या अगदी कडेला लागून उभारण्याचा विचार करण्यात आलेला आहे. ४) प्रकल्प हा पश्चिम दिशेला आहे. वारे नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि म्हणून याचा परिणाम पुनावळेसोबतच वाकड , ताथवडे , हिंजवडी आय टी पार्क , मारुंजी, मुंबई पुणे महामार्गासारख्या आधीच विकसित असलेल्या परिसरात देखील होण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMuncipal Corporationनगर पालिका