शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

उद्योगनगरीत वादळासह पावसाची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 19:30 IST

पिंपरी चिंचवडमध्ये वादळीवाऱ्यासह पावसाने जाेरदार हजेरी लावली. यात काही जाहीरातीच्या फरकांचे नुकसान झाले तर काही ठिकाणी झाडाच्या फांद्या देखील काेसळल्या.

पिंपरी : उद्योगनरीत रविववारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरवासी सुखावले असून, वातावरणात गारवा झाल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान काही ठिकाणी जाहिरात फलकांचे नुकसान झाले असून झाडांच्या फांद्या पडल्या. तसेच वाहनचालक आणि पादचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. 

पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती.  मात्र त्यावेळी केवळ शिडकावा केल्यासारखा पाऊस झाला. उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला. मात्र शनिवारी आणि सलग रविवारीही मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. रविवारी दुपारनंतर वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली. सायंकाळी आकाशात ढग जमा झाले होते. काळ्या ढगांमुळे पावसाचे वातावरण झाले होते. पावणेसहाच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा सुरु झाला. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांची कसरत झाली. सहाच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. खरेदीला बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. 

रविवारी सुटीचा दिवस असल्याने शहरातील चाकरमाने मोठ्या संख्येने रविवारी सायंकाळी खरेदीसाठी बाहेर पडले होते. पिंपरीतील शगुन चौक आणि मुख्य बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. अचानक वादळी पाऊन आल्याने या चाकरमान्यांची आणि बाजारपेठेतील पथारीवाले, हातगाडीवाले आणि व्यावसायिकांची तारांबळ झाली. उघड्यावरील विक्रीच्या साहित्याची आवराआवर करताना त्यांची धांदल उडाली. त्याचप्रमाणे चिंचवडगावातील चापेकर चौक, मंडई परिसरात, निगडी, चिखलीतील कृष्णानगर चौकातील मंडई परिसर, भोसरी येथील उड्डाणुलाखालील मुख्य चौक व परिसरात विक्रेत्यांची कसरत झाली. 

चिमुकल्यांनी लुटला आनंदशाळांना सुटी असल्याने तसेच रविवारी सुटी असल्याने अनेक पालक आपल्या चिमुकल्यांसह शहरातील उद्यांनामध्ये विरंगुळ्यासाठी आले होते. मात्र अचानक वादळी पावसामुळे त्यांची धांदल उडाली. असे असले तरी लहान मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. निगडीतील भक्ती-शक्ती उद्यानालगतच्या व्यावसायिकांची त्रेधातिरपीट झाली. 

विजांचा कडकडाटरविवारी सायंकाळी आकाशात अचानक ढग दाटून आले. पावसाच्या आगमनावेळी ढगांचा गडगडाट झाला. तसेच विजांचाही कडकडाट होत होता. सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.

टॅग्स :Rainपाऊसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड